पोपटलाल करणार काळाबाजार करणा-यांचा पर्दाफाश, तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत सद्यस्थितीवर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 07:12 PM2021-05-12T19:12:50+5:302021-05-12T19:20:02+5:30
तारक मेहता का उल्टा चष्मा च्या आगामी भागात अशाच एका कथेतून समाजात होत असलेल्या बेकायदेशीर काळाबाजारीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे
देशात सध्या सुरु असलेल्या कोरोना संकटात नागरिकांना बर्याच समस्यांचा, जसे विशिष्ट औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची कमतरतेचा सामना करावा लागत आहे. कोव्हिडच्या उपचारासाठी वापरले जाणारे औषधे आणि इंजेक्शंसच्या वाढत्या मागणी आणि मर्यादित पुरवठेचा फायदा घेऊन काही लोक बेकायदेशीरपणे पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे असहाय्य नागरिकांची धडपड होत आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या आगामी भागात अशाच एका कथेतून समाजात होत असलेल्या बेकायदेशीर काळाबाजारीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शोमध्ये, पोपटलाल यांना अशाच एका खास सिंडिकेटची माहिती मिळते जे औषधे आणि वैद्यकीय उपकरणांची ब्लॅकमार्केटिंग आणि होर्डिंग सह भेसळ करत आहे. पोपटलाल एक जबाबदार पत्रकार असल्यामुळे, याची चौकशी करून हा गैरव्यवहार उघड करण्याचा निर्णय घेतात. पोपटलाल आपल्या सहकारी आणि डॉ. हाथीच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन करण्याचा विचार करतात आणि ताबडतोब त्यांची योजना बनवायला सुरू करतात.
तारक मेहता का उल्टा चष्मा ने नेहमीच आपल्या प्रेक्षकांना हसवण्याबरोबर विविध सामाजिक विषयाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या नवीन कथेतून ह्या शो ने लोकांच्या जीवनात येणाऱ्या अश्या समस्यावर लक्षकेंद्रित करण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर शो मध्ये समांतर रूपाने पत्रकार आणि डॉक्टर जीव धोक्यात टाकून समाजाच्या प्रति आपली जबाबदारी कशी पार पाडत आहेत हे ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा जगातील सर्वाधिक चालणारा कॉमेडी शो आहे आणि या कार्यक्रमाची बहुतेक पात्रं भारत आणि इतर अनेक देशांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. २००८ पासून प्रदर्शित असलेला तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो आता १३ व्या वर्षात आहे आणि या कार्यक्रमाने ३१०० पेक्षा अधिक भाग प्रदर्शित केले आहेत. हा एकमेव भारतीय शो आहे जो लाईव्ह ऍक्शन, ऍनिमेशन आणि तेलगू आणि मराठी भाषेत सुरु आहेत.