'दिलबर मेरे...' गाण्यावर अमिताभ आणि विद्या बालनचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 11:37 AM2024-10-17T11:37:32+5:302024-10-17T11:39:17+5:30

अमिताभ आणि विद्या बालन या दोघांनी KBC च्या मंचावर सुंदर डान्स केलाय. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय (amitabh bachchan, vidya balan, kbc)

amitabh bachchan and vidya balan dance on dibar mere song at kbc 16 satte pe satta | 'दिलबर मेरे...' गाण्यावर अमिताभ आणि विद्या बालनचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

'दिलबर मेरे...' गाण्यावर अमिताभ आणि विद्या बालनचा रोमँटिक डान्स, व्हिडीओ व्हायरल

सध्या KBC च्या १६ व्या पर्वाची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या खुमासदार शैलीत KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. अमिताभ बच्चन KBC 16 च्या मंचावर सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांच्या आयुष्याचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच KBC 16 च्या मंचावर सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन आणि कार्तिक आर्यन 'भूल भूलैय्या ३' च्या प्रमोशनसाठी आले आहेत. यावेळी विद्याने अमिताभ यांच्यासोबत केलेला रोमँटिक डान्स चांगलाच व्हायरल झालाय.

अमिताभ-विद्याचा रोमँटिक डान्स

KBC 16 च्या मंचावर अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांचा रोमँटिक डान्स व्हायरल झालाय. बिग बींचा हात हातात पकडून विद्याने बिग बींसोबत केलेल्या या खास डान्सची सध्या चांगलीच चर्चा आहे. अमिताभ यांच्या 'दिलबर मेरे कब तक मुझे ऐसे ही तडपाओगे' या गाण्यावर अमिताभ - विद्या यांनी डान्स केलाय. यावेळी डान्स करताना अमिताभ काहीसे लाजलेले दिसले. तर दुसरीकडे कार्तिक आर्यनने या दोघांच्या डान्सला चांगलीच दाद दिली.


डान्स केल्यावर अमिताभ काय म्हणाले?

"KBC वाल्यांनो हा एपिसोड संपल्यावर आम्हाला खूप मार पडणार  आहे. कोणतीही कल्पना न देता त्यांनी आमच्यावर अनेक गोष्टी लादल्या आहेत", असा मिश्कील खुलासा अमिताभ यांनी केलाय. दरम्यान विद्या आणि कार्तिक आर्यन त्यांच्या आगामी 'भूल भूलैय्या ३'च्या प्रमोशनसाठी आले आहेत. या दोघांचा 'भूल भूलैय्या ३' हा सिनेमा १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे. 'भूल भूलैय्या ३'ची टक्कर अजय देवगणच्या बिग बजेट मल्टीस्टारर 'सिंघम अगेन'शी होणार आहे. 'भूल भूलैय्या ३'मध्ये कार्तिक आणि विद्यासोबत माधुरी दीक्षितही प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.

Web Title: amitabh bachchan and vidya balan dance on dibar mere song at kbc 16 satte pe satta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.