KBC 14 : ‘कौन बनेगा करोडपती 14’साठी अमिताभ बच्चन यांनी किती मानधन घेतलं माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:26 AM2022-08-18T11:26:47+5:302022-08-18T11:29:02+5:30
Kaun Banega Crorepati 14 : बॉलिवूड ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी इंडस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीतही काही ध्रुव ताऱ्यासारख्या निढळ व्यक्ती आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) हे असंच एक नाव...
Kaun Banega Crorepati 14 : बॉलिवूड ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी इंडस्ट्री आहे. पण या इंडस्ट्रीतही काही ध्रुव ताऱ्यासारख्या निढळ व्यक्ती आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) हे असंच एक नाव. अमिताभ यांच्यापुढे सर्वांची चमक फिकी पडते. चित्रपट येवो, ना येवो, त्यांची चमक कधीच फिकी पडली नाही. बॉलिवूडमध्ये अनेक आलेत, अनेक गेलेत, पण अमिताभ बच्चन नावाचा एक अढळ तारा आजही आपल्या तेजाने चकाकतो आहे. म्हणूनच ते महानायक आहेत.
बिग बी दीर्घकाळापासून ‘कौन बनेगा करोडपती’या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. हा शो होस्ट करण्यासाठी अमिताभ किती मानधन घेत असतील? असा प्रश्न तुम्हालाही अनेकदा पडत असेल?
प्रत्येक सीझनसोबत अमिताभ यांच्या मानधनात वाढ झाली आहे आणि सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या 14 व्या सीझनसाठीचं त्यांचं मानधन कोट्यवधीच्या घरात आहे. होय,‘कौन बनेगा करोडपती 14’च्या एका एपिसोडसाठी ते सुमारे 7.5 कोटी घेत असल्याचं कळतंय.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘कौन बनेगा करोडपती’च्या पहिल्या सीझनसाठी अमिताभ यांनी 1 कोटी रुपये चार्ज केले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या सीझसाठी त्यांनी 2कोटींची डिमांड केली होती. चौथ्या सीझनसाठी मात्र त्यांनी फी कमी केली होती. या सीझनसाठी ते 1 कोटी मानधनावर तयार झाले होते. मात्र सीझन 7 साठी त्यांनी 7 कोटी रुपयांची मागणी केली होती. विशेष म्हणजे, निर्मात्यांनी त्यांची ही डिमांड पूर्ण देखील केली होती. सध्याच्या सीझनसाठी अमिताभ बच्चन हे 7.5 कोटी रुपये घेत आहेत. बिग बी 2000 पासून ‘कौन बनेगा करोडपती’ होस्ट करत आहेत. सध्या या शोचा 14 वा सीझन सुरू आहे.