Kaun Banega Crorepati 16 : 'केबीसी 16' च्या हॉट सीटवर बसायचं आहे! जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 02:19 PM2024-07-28T14:19:14+5:302024-07-28T14:19:45+5:30

  नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे.

Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 16 Registration Process know detailed | Kaun Banega Crorepati 16 : 'केबीसी 16' च्या हॉट सीटवर बसायचं आहे! जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रक्रिया

Kaun Banega Crorepati 16 : 'केबीसी 16' च्या हॉट सीटवर बसायचं आहे! जाणून घ्या संपूर्ण नोंदणी प्रक्रिया

Kaun Banega Crorepati 16 : सामान्य माणसाला एका खेळातून करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा आणि त्यासाठी संधी देणारा कार्यक्रम  'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati ) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमाच्या 16 व्या सिझनचा प्रिमियर पुढच्या महिन्यात 12 ऑगस्ट रोजी होणार आहे.   नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो समोर आला आहे.  केबीसीच्या या नव्या सिझनमध्ये तुम्हाला सहभागी  (Kaun Banega Crorepati 16 Registration Process) व्हायचं असेल तर तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता. तर जाणून घेऊया नोंदणी प्रक्रिया कशी असते.

या स्टेप्स करा फॉलो 

  1. KBC 16 मध्ये नोंदणी करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करावे लागेल.
  2. आता तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.
  3. प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर जी काही प्रक्रिया केली असेल ती पूर्ण करावी लागेल. 
  4. यानंतर तुमच्या स्क्रीनवर 'Registration Confirm' असं लिहिलेलं दिसेल.


तुम्ही एसएमएसद्वारे (KBC 16 SMS Registration) 'कौन बनेगा करोडपती 16' साठी नोंदणी करू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन KBC लिहा. त्यानंतर स्पेस देऊन नोंदणीसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शनमध्ये द्या. मग तुमचे वय आणि लिंग लिहा व हा मेसेज 509093 वर पाठवा. याशिवाय सोनी लिव्हच्या http://www.sonyliv.com याअधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता. oneindiaने याबद्दल वृत्त दिले आहे.


सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय काळजीपूर्वक द्या. कारण हॉट सीटवर पोहोचण्यासाठी ही तुमची पहिली पायरी असेल. लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना निट द्या, जेणेकरून KBC टीमला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते तुमच्याशी सहज संपर्क करू शकतील. 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या 16 व्या सिझनची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निर्मात्यांकडूनही स्पर्धकांची निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या स्पर्धकांसोबत या कार्यक्रमाचे शूटींग केले जाईल. यानंतरच या कार्यक्रमाचे प्रक्षेपण केले जाईल. 
 

Web Title: Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 16 Registration Process know detailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.