'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 12 लाखांसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 10:51 AM2024-08-30T10:51:19+5:302024-08-30T10:51:47+5:30

अमिताभ बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या अफलातून शैलीत KBC 16 चं होस्टिंग करत आहेत. KBC 16 च्या मंचावर विविध स्पर्धक लक्ष वेधून घेत आहेत

Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 16 Retired Teacher Gave Wrong Answer To 12 Lakhs Question | 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 12 लाखांसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये 12 लाखांसाठी विचारला 'हा' प्रश्न, तुम्हाला माहितेय का उत्तर?

Kaun Banega Crorepati : लोकप्रिय भारतीय रिॲलिटी टीव्ही क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती'चा १६वा सीझन सुरू झाला आहे. प्रश्न-उत्तरांच्या या खेळात बिग बी त्यांच्या अनोख्या अंदाजाने स्पर्धकांना प्रश्न विचारतात. विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देत स्पर्धक लाखो – कोट्यवधी रुपये जिंकतात. 29 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये गुजरातमधील निवृत्त शिक्षक परितोष भट्ट यांना 12.5 लाख रुपयांचा प्रश्न विचारण्यात आला. चला तर मग जाणून घेऊया हा प्रश्न काय होता आणि त्याचे उत्तर काय दिले? जाणून घ्या

अमिताभ बच्चन यांनी हॉट सीटवरील परितोष भट्ट यांना बर्माच्या ब्रिटीश औपनिवेशिक ध्वजावर कोणता पक्षी दिसायचा? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर त्यांना A - गरुड, B-कोंबडा,  C-मोर आणि  D-हंस असे चार पर्याय देण्यात आले. या प्रश्नाचे अचूक उत्तर मोर हे होते. पण,  परितोष भट्ट यांनी चुकीचे उत्तर दिल्याने त्यांनी मोठी रक्कम गमावली. सध्या हा प्रश्न सोशल मीडियावर देखील चर्चेत आहे.


क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' हा छोट्या पडद्यावरचा रिअॅलिटी शो  लोकांचे मनोरंजन करण्यासोबतच त्यांच्या ज्ञानात देखील भर घालतो. हा शो सुरू झाल्यापासून भारतातील लोक या मंचावर येण्यास उत्सुक आहेत. अनेक लोकांसाठी, हा मंच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरतो. या मंचावर जिंकलेल्या बक्षिसाच्या रकमेने अनेकांचे भविष्य बदलले आहे. सध्या या शोचा 16वा सीझन सुरु आहे.

Web Title: Amitabh Bachchan Kaun Banega Crorepati 16 Retired Teacher Gave Wrong Answer To 12 Lakhs Question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.