"माझी त्याच्याशी तुलना करु नका", अल्लू अर्जुनबद्दल बिग बी म्हणाले, "तो प्रतिभावान अभिनेता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 16:40 IST2024-12-27T16:40:13+5:302024-12-27T16:40:56+5:30
केबीसी शोमध्ये स्पर्धकाला असं का म्हणाले बिग बी?

"माझी त्याच्याशी तुलना करु नका", अल्लू अर्जुनबद्दल बिग बी म्हणाले, "तो प्रतिभावान अभिनेता..."
अमिताभ बच्चन (Amitabh Bahchan) यांनी नुकतंच 'पुष्पा २' अभिनेता अल्लू अर्जुनबाबत (Allu Arjun) प्रतिक्रिया दिली आहे. 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात एका स्पर्धकाने त्यांची आणि अल्लू अर्जुनची तुलना केली. यावर अमिताभ बच्चन माझी त्याच्याशी तुलना करु नका असं म्हणाले. तो स्पर्धक नक्की काय म्हणाला वाचा.
कौन बनेगा करोडपती शोमध्ये रजनी बरनीवाल या महिला स्पर्धकाने 'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनचा विषय काढला. ती त्याची मोठा आहे. तिने अमिताभ बच्चन आणि अल्लू अर्जुनची दोघांचीही स्तुती केली. तिचं अल्लू अर्जुनवरचं प्रेम पाहून बिग बींनीही तिला चिडवलं. बिग बी म्हणाले, "आता त्याच्यासोबत माझं नाव घेऊन काही उपयोग नाही. अल्लू अर्जुन प्रतिभावान कलाकार आहे. तो इतक्या लोकप्रियतेसाठी पात्र आहे. मीही त्याचा मोठा चाहता आहे. नुकताच त्याचा पुष्पा २ आला आहे. तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहा. पण माझी आणि त्याची तुलना करु नका."
यानंतर रजनी बरनीवाल यांनी जोर देऊन दोघांमधील साम्य सांगितलं. त्या म्हणाल्या, "तुमच्या दोघांची एन्ट्री अविश्वसनीय असते. तुमची शैलीही खूप सारखी आहे. जेव्हा कॉमेडी सीन असतो तेव्हा तुम्ही दोघंही आपली कॉलर उडवता आणि डोळे मिटता." अमिताभ बच्चन यावर म्हणाले, अशा कोणत्या सिनेमात मी असं केलं आहे? तेव्हा रजनी त्यांच्या अमर अकबर अँथनी सिनेमाबद्दल सांगतात. तुम्हाला भेटून माझं स्वप्न पूर्ण झालं. आता अल्लू अर्जुनला भेटायचं राहिलं आहे. "