असह्य वेदना पण ‘शो मस्ट गो ऑन’; अमिताभ बच्चन यांच्या तळपायाच्या बोटाला फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 16:14 IST2021-10-01T16:13:00+5:302021-10-01T16:14:57+5:30
Amitabh Bachchan : असह्य वेदना होत आहेत. पण तरीही अमिताभ केबीसीचे शूटींग करत आहेत.

असह्य वेदना पण ‘शो मस्ट गो ऑन’; अमिताभ बच्चन यांच्या तळपायाच्या बोटाला फ्रॅक्चर
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या ‘कौन बनेगा करोडपती 13’च्या (Kaun Banega Crorepati 13) शूटींगमध्ये बिझी आहेत. सध्या काय तर असह्य वेदना होत आहेत. पण तरीही अमिताभ केबीसीचे शूटींग करत आहेत. होय, अमिताभच्या तळपायाचं बोट फ्रॅक्चर झालं आहे आणि वेदनांनी अमिताभ विव्हळत आहेत. आपल्या ब्लॉगवर फ्रॅक्चर बोटाचा फोटो पोस्ट करत, त्यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.
तळपायाच्या बोटाला फ्रॅक्चर आहे आणि मी असह्य वेदना सहन करतोय. फ्रॅक्चरच्या ठिकाणी प्लास्टर केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे ‘बडी टॅपिंग’ केलं आहे. बोट लपवण्यासाठी कॅमोफ्लॉज जोडे घातले आहेत. मोज्यासारखे आहेत पण आहेत जोडेच. माझ्या तुटलेल्या बोटासाठी सॉफ्ट प्रोटेक्शन....असं त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. तथापि बोटाला दुखापत कशी झालेली, ते त्यांनी सांगितलेलं नाही.
म्हणून पारंपरिक कपड्यांमध्ये दिसणार...
केबीसी 13च्या हॉटसीटवर अमिताभ कायम सूटाबुटात दिसतात. पण आता येणाºया काही एपिसोडमध्ये ते पारंपरिक देसी लुकमध्ये दिसणार आहेत. यामागचं कारण अर्थात तळपायाच्या बोटाला झालेली दुखापत. बोट फ्रॅक्चर झाल्याने अमिताभ जोडे घालू शकत नाही. त्यामुळे फॉर्मल सूट व ब्लेझर असा पोशाख त्यांना करता येणार नाही.
येत्या शुक्रवारी म्हणजे उद्याच्या केबीसी 13 च्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत हॉटसीटवर अभिनेता प्रतीक गांधी व पंकज त्रिपाठी दिसणार आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर अमिताभ बच्चन यांच्याकडे सध्या अनेक सिनेमे आहेत. नुकताच त्यांचा ‘चेहरे’हा सिनेमा रिलीज झाला. यानंतर ते हॉलिवूडपट ‘द इंटर्न’च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहेत. रश्मिका मंदानाची मुख्य भूमिका असलेल्या ‘गुडबाय’ या सिनेमातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय रणबीर कपूर व आलिया भट स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमातही ते दिसणार आहेत.