बिग बींना सोडायचंय केबीसी? म्हणाले, सूत्रसंचालन नाही तर मॅरेज...कारण ऐकून येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 01:26 PM2023-10-14T13:26:21+5:302023-10-14T13:28:38+5:30

नुकत्याच एका एपिसोडमध्ये बच्चन यांनी केबीसीचं सूत्रसंचालन सोडण्याची गोष्ट केली.

Amitabh Bachchan wants to leave host posotion in kbc instead he will start marriage counselling | बिग बींना सोडायचंय केबीसी? म्हणाले, सूत्रसंचालन नाही तर मॅरेज...कारण ऐकून येईल हसू

बिग बींना सोडायचंय केबीसी? म्हणाले, सूत्रसंचालन नाही तर मॅरेज...कारण ऐकून येईल हसू

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या शोने टीव्हीवरही ओळख दिली. केबीसी च्या सूत्रसंचालनासाठी बिग बींना सोडून इतर कोणाचीही कल्पना करवणार नाही. त्यांचं शुद्ध हिंदी, मध्येच मारलेले पंचेस हे सगळंच आता प्रेक्षकांच्या सवयीचं झालं आहे. पण नुकत्याच एका एपिसोडमध्ये बच्चन यांनी केबीसीचं सूत्रसंचालन सोडण्याची गोष्ट केली. नेमकं झालं काय बघुया.

केबीसीच्या नुकत्याच रिलीज झालेल्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन गंमतीतच म्हणाले की त्यांना सूत्रसंचालन पदावर काढून मॅरेज काऊन्सिलरची पोझिशन देण्यात यावी. कारण शोमध्ये अनेकदा स्पर्धक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी सांगताना दिसतात आणि अमिताभ बच्चन त्याचं निवारण करतात. नुकतंच हॉटसीटवर बसलेल्या एका महिलेने तिच्या पतीची तक्रार बिग बींसमोर केली. तेव्हा त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

नवी दिल्लीच्या एक गृहिणी रचना रस्तोगी हॉटसीटवर बसल्या होत्या. तेव्हा रचना यांनी पतीची तक्रार करायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या,'माझे पती इथे फुकटात आले आहेत.कारण केबीसीनेच त्यांचा सगळा खर्च उचलला आहे. ते फारच कंजुस आहेत. मला कुठेही बाहेर फिरायला नेत नाहीत.' अमिताभ बच्चन यांनी महिलेचं सगळं ऐकलं आणि शेवटी म्हणाले,'चॅनलवालो, माझी अँकर ही पोस्ट बदलून मॅरेज काऊन्सिलर करा. ही एकच जागा मिळते जिथे घरच्या सगळ्या तक्रारी सांगता येतात.आम्ही त्याचं निवारण करतो.' नंतर अमिताभ बच्चन यांनी रचना यांच्या पतीला थोडाफार खर्च करायला सुरु करा असा सल्ला दिला. यावेळी बच्चन यांनी प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं.

Web Title: Amitabh Bachchan wants to leave host posotion in kbc instead he will start marriage counselling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.