​छोट्या पडद्यावर ‘अम्मा’राज !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2016 09:35 AM2016-06-20T09:35:37+5:302016-06-20T15:05:37+5:30

नकाब, खट्टा मीठा, आक्रोश अशा सिनेमात काम केल्यानंतर अभिनेत्री ऊर्वशी शर्मा छोट्या पड्यावर एंट्री मारतेय.. ‘एक माँ जो लाखो के ...

'Amma'raj on small screen! | ​छोट्या पडद्यावर ‘अम्मा’राज !

​छोट्या पडद्यावर ‘अम्मा’राज !

googlenewsNext
ाब, खट्टा मीठा, आक्रोश अशा सिनेमात काम केल्यानंतर अभिनेत्री ऊर्वशी शर्मा छोट्या पड्यावर एंट्री मारतेय.. ‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून ऊर्वशी छोट्या पडद्यावर पदार्पण करतेय.. याचनिमित्ताने ऊर्वशीशी साधलेला हा संवाद
 
- ‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री होतेय...  शीर्षकावरुनच ही मालिका एक स्त्रीच्या संघर्षावर आधारित असल्याचं कळतंय.. तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल..
 
‘एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ ही मालिका दोन लेकरांची आई असलेल्या झीनतची कहानी आहे.. भारताच्या फाळणीनंतर झीनतचा पती तिला सोडून देतो.. त्या काळात महिलांना कोणतेही अधिकार नव्हते... ना जगण्याचं स्वातंत्र्य होतं ना बोलण्याचं.. ना काही सुरक्षा होती.. अशा परिस्थितीमध्ये झीनतकडे फक्त दोन पर्याय उरतात. एक म्हणजे स्वतःला सावरुन सारं काही मुकाटपणे सहन करावं किंवा दुसरं म्हणजे आपल्या मनात खदखदत असलेली व्यवस्थेबद्दल आणि अन्यायाबाबतची चीड व्यक्त करणं.. त्याचवेळी झीनत दुसरा पर्याय निवडते आणि पुरुषांच्या या दुनियेत स्वतःचं असं वेगळं स्थान, प्रतिष्ठा निर्माण करते.. तिचा हा संघर्षमयी लढा म्हणजेच 'एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा' या मालिकेची कथा आहे.   
 
 अम्माच्या भूमिकेत काय वेगळेपण होतं ज्यामुळं ही भूमिका स्वीकारावी असं वाटलं ?
 
या मालिकेत मी साकारत असलेली झीनत म्हणजेच अम्मा ही भूमिका कोणाचीही आई असू शकते. ही अम्मा काळाच्या खूप पुढे होती. प्रत्येकाला या झीनतमध्ये आपली काळजी घेणा-या आईची झलक पाहायला मिळेल. आपल्या कुटुंबासाठी ती सर्वस्व पणाला लावते याचं उदाहरण ही अम्मा ठरणार आहे. त्यामुळं प्रत्येक रसिकाला ही मालिका आपल्याशी संबधित वाटेल. यातील अम्माच नाही तर प्रत्येक पात्र त्यांना आपल्या जवळचं वाटेल. मात्र सगळ्यात जास्त अम्मा रसिकांना प्रेरणा देऊन जाईल.. तिचा संघर्ष, तिचा लढा सारं काही प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. तसंच सासू-सुनेच्या नेहमीच्या मालिकांपेक्षा काही तरी वेगळं करण्यासाठी मिळणार असल्यानं ही भूमिका स्वीकारली..  
 
अम्माच्या या भूमिकेसाठी काय विशेष तयारी किंवा रिसर्च केलं का ?
 
खरं सांगायचं तर अम्मा साकारण्यासाठी काहीही विशेष तयारी केली नाही.. कारण आई ही आई असते. जगातील कोणत्याही आईची माया ही सारखीच असते. त्यामुळं काही वेगळं रिसर्च, तयारी केली नाही. त्यातच या मालिकेत थोडं ड्रेसिंग, लूक्सवर मेहनत घेतली. मुस्लिम व्यक्तीरेखा असल्यानं त्या पद्धतीचे कपडे, दागिने परिधान करावे लागले.. सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागलं ते बोलण्याच्या लहेजावर.. अदबशीर आणि आदरयुक्त बोलण्याची स्टाईलवर विशेष मेहनत घेतली..     
 
या मालिकेचं शूटिंग आऊटडोअर आहे. तर शूटिंग करतानाची काय आव्हानं आहेत ?
 
या मालिकेचं शूटिंग हैदराबादमध्ये होतंय. तसं पाहिलं तर माझं घर ऑफिस हैदराबादमध्येही असल्यानं फार धावपळ होत नाही. मात्र दोन दोन दिवस कुटुंबापासून दूर राहावं लागतं त्याचा थोडा फार त्रास होतो. त्यात सगळ्यात मोठा अडथळा येतोय तो हैदराबादच्या वाढत्या तापमानाचा. 50 अंश तापमानात शूटिंग पार पडतंय.. माझ्यासाठी ते खरंच खूप चॅलेंजिग आहे.
 
या मालिकेतील अम्मा नीडर आहे.. तू स्वतः तशी आहेस का, एखादा किस्सा ?
 
अम्मा जशी नीडर आहे तशीच मी सुद्धा आहे. मी रियलमध्ये कुणालाही मारु शकते. अन्याय सहन करणं मला पसंत नाही. कुणी मुलींची छेड काढतं, विचित्र पद्धतीने वागतं त्यांना धडा शिकवायलाच हवा. असाच एक किस्सा माझ्याबरोबर घडला होता जेव्हा मी शाळेत होते.. मी आणि माझी बहिण शाळेत जायचो त्यावेळी एक मुलगा नेहमी पाठलाग करायचा.. त्याची हिंमत इतकी होती की तो दररोज घरापर्यंत यायचा. त्याचं हे वागणं पाहून मी त्याला समजावलं की पाठलाग करु नको. मात्र तो काही सुधारला नाही. अखेर मी याबाबत मी पोलिसांत तक्रार दाखल केली.. पोलिसांनी सांगितलं की तू त्या मुलाला ओळखशील का. दुस-या दिवशी त्यांनी सापळा रचला आणि माझ्याकडून ओळख पटवून घेत त्या मुलाला पकडलं.. तेव्हा पोलिसांनी मला विचारलं की तू याला धडा शिकवणार का... तेव्हा मी अक्षरक्षा बदडून काढलं... त्यानंतर मात्र शाळेतून येता जाता तो मुलगा आम्हाला कधीही दिसला नाही.    
 
या मालिकेत तू स्टंट केले आहेस.. दागिने परिधान केलेत तर त्याविषयी काय सांगशील
 
यांत मी काही स्टंटसुद्धा केलेत.. रिअल स्टंट करताना मजा आली असली तरी तोसुद्धा एक वेगळा अनुभव होता.. मी दागिने परिधान करत नाही. त्यामुळं मला एलर्जी होते.. सुरुवातीला त्याचा मला त्रासही झाला.. आता माझ्या या भूमिकेसाठी वेगळे दागिने बनवून घेण्यात आलेत..     
 
एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा’ ही मालिका रसिकांनी का पाहावी...
 
ही मालिका म्हणजे एक प्रेरणादायी आणि संघर्षमयी प्रवास आहे.. अम्माची कथा पाहून तुम्हालाही नवी प्रेरणा मिळेल. अन्याय करणं हा गुन्हा आहेच मात्र तो सहन करत राहणं त्याहूनही मोठा गुन्हा आहे. याच अन्यायाविरोधात झीनत पेटून उठते आणि सामान्य आई ते लाखोंची अम्मा कशी बनते हे तुम्हाला या मालिकेत पाहायला मिळणार आहे. याशिवाय यातील प्रत्येक पात्र तुम्हाला जवळचं वाटेल.. प्रत्येक पात्रातून काही ना काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

 - Suvarna.jain@lokmat.com

Web Title: 'Amma'raj on small screen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.