अमृता देशमुखने लग्नानंतर साजरी केली पहिली मंगळागौर, म्हणते - "प्रसादसारखा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 13:22 IST2024-08-21T13:19:57+5:302024-08-21T13:22:23+5:30
Amruta Deshmukh : अभिनेत्री अमृता देशमुखने लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी केली आहे. तिने मंगळागौरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अमृता देशमुखने लग्नानंतर साजरी केली पहिली मंगळागौर, म्हणते - "प्रसादसारखा..."
बिग बॉस मराठी (bigg boss marathi) शोमधून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade). बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ही जोडी एकमेकांना डेट करु लागली आणि काही काळातच त्यांनी एकमेकांशी लग्न सुद्धा केले. हे जोडपे बऱ्याचदा चर्चेत येत असते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. दरम्यान अभिनेत्री अमृता देशमुखने लग्नानंतर पहिली मंगळागौर साजरी केली आहे. तिने मंगळागौरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेत्री अमृता देशमुख हिने इंस्टाग्रामवर पहिल्या मंगळागौरचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, नटुन थटून साजरी केली मंगळागौर..प्रसादसारखा उत्साही नवरा मिलेगा ना कही और. ज्याच्यासाठी हे व्रत केले..त्याची सगळ्या सोहळ्यात इतकी छान साथ मिळते तेव्हा आनंद अजूनच द्विगुणित होतो.
अमृताने तिच्या पहिल्या मंगळागौरसाठी पर्पल रंगाची नववारी साडी नेसली आहे. कपाळी चंद्रकोर, नाकात नथ आणि केसांचा सुंदर आंबाडा घालून तिने हा मराठमोळा साज केला आहे. तर प्रसादने क्रिम कलरचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचं धोतर नेसले आहे. अमृता या लूकमध्ये खूप सुंदर दिसते आहे. तसेच ते दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. अमृताच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
अमृता-प्रसादने या दिवशी बांधली लग्नगाठ
अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनी १८ नोव्हेंबर, २०२३ रोजी लग्नगाठ बांधवी. त्यांच्या लग्न सोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारमंडळींनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.
वर्कफ्रंट
अमृता आणि प्रसादच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या प्रसाद झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत काम करताना दिसतो आहे. तर अमृता सध्या रंगभूमीवर कार्यरत असून ती नियम व अटी लागू या नाटकात काम करते आहे.