'सावल्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, सारंगच्या लग्नाची तारीख ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 12:52 IST2024-11-06T12:51:24+5:302024-11-06T12:52:33+5:30
Sawalyanchi Janu Savali : 'सावल्याची जणू सावली' ही मालिका रंजक वळणावर आली आहे. सावली आणि सारंग यांच्या कुटुंबातील दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे.

'सावल्याची जणू सावली' मालिकेत रंजक वळण, सारंगच्या लग्नाची तारीख ठरणार
'सावल्याची जणू सावली' (Sawalyanchi Janu Savali) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ही मालिका रंजक वळणावर आली आहे. सावली आणि सारंग यांच्या कुटुंबातील दिवाळी वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर, अनावधानाने सारंगच्या कुटुंबाची लक्ष्मी पूजा सावलीच्या हातून पार पडणार आहे. सावली आणि अप्पू घरी असताना, अप्पूला छातीत वेदना होतात, आणि सावली रस्त्यावर मदतीसाठी आर्जव करते. त्याच वेळी, ऐश्वर्या अस्मीवर संशय घेते की ती मद्यधुंद आहे, आणि तिचा पाठलाग करते.
अस्मी ऐश्वर्यापासून वाचण्यासाठी पळ काढते आणि तिचा अपघात होतो. त्याचवेळेस तिलोत्तमा सारंग आणि अस्मीच्या लग्नाचा निर्णय घेत असल्याची घोषणा करते आणि लग्नाची तारीख ठरवते. इकडे ऐश्वर्या अस्मीला रंगेहाथ पकडते, आणि त्यांच्यात एक प्रकारचा व्यवहार होतो. तर जगन्नाथ सावलीच्या घरी जाऊन लग्नाचे तारीख ठरवल्याचं सांगतो आणि संपूर्ण कुटुंब त्याला सहमती देते.
सारंगच्या लग्नाची तारीख ठरेल का?
अस्मिला रंगेहाथ पकडल्यावर सारंगच्या लग्नाची तारीख ठरू शकेल? ऐश्वर्या, अस्मीमध्ये असा काय करार झालाय ? हे सगळे जाणून घेण्यासाठी 'सावल्याची जणू सावली' दररोज संध्या ७ वाजता फक्त झी मराठीवर पाहायला मिळेल.