'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 16:15 IST2024-05-28T16:13:11+5:302024-05-28T16:15:14+5:30
अनघा अतुलने नायक सिनेमातील अनिल कपूर - राणी मुखर्जीचा लूक रिक्रिएट केलाय. तिचा हा डान्स परफॉर्मन्स बघाच (anagha atul)

'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
अनघा अतुल ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. अनघाने आजवर विविध माध्यमांत तिच्या अभिनयाची छाप पाडलीय. टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अनघा भगरेला ओळखलं जातं. अनघाचे वडील अतुल भगरे हे सुप्रसिद्ध ज्योतिषी आहेत हे आपल्या सर्वांना माहितच आहे. अनघाने नुकताच 'नायक' सिनेमातील 'रुखी सुखी रोटी' गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय.
अनघाचा रुखी सुटी रोटी गाण्यावर भन्नाट डान्स
अनघाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत अनघाने केसात गजरा माळलाय. याशिवाय एक वेगळाच ड्रेस परिधान करुन तिने 'नायक' सिनेमातील गाजलेल्या 'रुखी सुटी रोटी' गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. तिच्यासोबत प्रथमेश परब हा डान्सर दिसतोय. या दोघांनी अनिल कपूर-राणी मुखर्जींचा हा लूक रिक्रिएट केलाय. या दोघांच्या या भन्नाट परफॉर्मन्सला लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत पसंती दिली आहे.
अनघा अतुलचं वर्कफ्रंट
अनघा अतुलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. ती सध्या कोणत्याही नवीन मालिकेत झळकत नाहीय. तिने याआधी 'दिल दोस्ती दोबारा', 'रंग माझा वेगळा' मालिकांमध्ये काम केलंय. अलीकडेच अनघा 'पिरतीच्या वनवा उरी पेटला' मालिकेत झळकली. अनघाने काही महिन्यांपुर्वी 'वदनी कवळ' हॉटेल पुण्यात ओपन केलं. अनघा ते हॉटेल सांभाळत असते. अनघाच्या घरी सध्या तिच्या भावाच्या लग्नाची लगबग सुरु आहे.