पैशांपेक्षा आनंद महत्त्वाचा - ​आदित्य नारायण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2016 07:58 AM2016-06-17T07:58:34+5:302016-06-17T13:28:34+5:30

आदित्य नारायण सध्या सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्याचा मोहोब्बत हा अल्बम लवकरच प्रदर्शित होत आहे. तसेच गाण्याच्या, ...

Anand is more important than money - Aditya Narayan | पैशांपेक्षा आनंद महत्त्वाचा - ​आदित्य नारायण

पैशांपेक्षा आनंद महत्त्वाचा - ​आदित्य नारायण

googlenewsNext
ित्य नारायण सध्या सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्याचा मोहोब्बत हा अल्बम लवकरच प्रदर्शित होत आहे. तसेच गाण्याच्या, अभिनयाच्या त्याला अनेक ऑफर्स मिळत आहेत. कामात सतत व्यग्र असल्याने तो प्रचंड खूश आहे. त्याच्या या प्रवासाबाबत सीएनएक्ससोबत त्याने मारलेल्या गप्पा...

सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल गेले पाच सिझन करत आहेस, तुझा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचा अनुभव कसा आहे?
सारेगमप हा माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. गेली दहा वर्षं मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमामुळे मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. मी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासोबतच यात अनेक वेळा गाणी गातो. लोकांना हसवण्यासाठी काही स्कीट सादर करतो. त्यामुळे मला माझी अभिनयकलाही लोकांसमोर सादर करता येते. तसेच या कार्यक्रमात मला स्टंटही करायला मिळतात. एकाच कार्यक्रमात इतक्या सगळ्या गोष्टी करायला मिळत असल्याने मी खूप खूश आहे. 
या कार्यक्रमातील तुझ्या जोक्सची नेहमीच चर्चा होत असते. त्याविषयी काय सांगशील?
मी या कार्यक्रमात अतिशय सांगत असलेले जोक्स हे अतिशय वाईट असले तरी ते लोकांना खूप आवडतात. खरे तर हे जोक्स मला लेखकांकडून लिहून दिलेले असतात. त्यामुळे यामध्ये माझे काहीच श्रेय नाहीये. कधीतरी एखादा जोक माझा स्वतःचा असतो. या जोक्सची माझ्या घरातही नेहमीच चर्चा होते. माझ्या वडिलांना एखादा जोक कळला नाही तर त्याचा अर्थ ते मला त्यांना सांगावा लागतो. माझे हे जोक्स इतके प्रसिद्ध होतील असे मला कधी वाटलेदेखील नव्हते. 
तुझा मोहोब्बत या अल्बमचा पहिला व्हिडिओ प्रदर्शित झाला असून त्याची चांगलीच चर्चा झाली होती. या अल्बममधील इतर व्हिडिओ रसिकांसमोर कधी येणार आहेत?
सारेगमपच्या फायनलला मी त्यातील एक व्हिडिओ सादर करणार आहे तर एक व्हिडिओ माझ्या वाढदिवसाला म्हणजे ६ ऑगस्टला प्रदर्शित होईल. मोहोब्बत या अल्बममध्ये एकूण आठ गाणी असून त्यातील अधिकाधिक गाणी मी स्वतः लिहिली असून संगीतदेखील माझेच आहे. तसेच आठही गाणी मीच गायली आहेत. या अल्बमचे वैशिष्ट्य म्हणजे हा अल्बम मला लोकांना एकही रुपये न घेता द्यायचा आहे. त्यासाठी सध्या टि-सिरिजचे भुषण कुमार यांच्यासोबत माझी चर्चा सुरू आहे. याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल.
अल्बमसाठी पैसे न घेण्यामागे काही कारण आहे का?
मोहोब्बत हा अल्बम माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यामुळे या अल्बममधील सगळीच गाणी लोकांनी ऐकावीत अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी याबाबतीत पैशांचा विचारच केलेला नाही आणि सध्या मी माझ्या गायनातून आणि सूत्रसंचालनातून चांगला पैसा कमवत आहे. काही गोष्टी या पैशांसाठी न करता आपल्याला मिळणाऱया आनंदासाठी कराव्यात असे मला वाटते. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे.

Web Title: Anand is more important than money - Aditya Narayan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.