अन् एका सीनसाठी विक्रमसिंहने घेतले २० दिवसांचे प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2016 04:35 PM2016-05-16T16:35:51+5:302016-05-16T22:05:51+5:30
‘जाना ना दिल से दूर’ या आगामी मालिकेत विक्रमसिंह चौहान हा एका बिनधास्त अथर्व नावाच्या नायकाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी ...
‘ ाना ना दिल से दूर’ या आगामी मालिकेत विक्रमसिंह चौहान हा एका बिनधास्त अथर्व नावाच्या नायकाच्या भूमिकेत आहे. यापूर्वी विक्रमसिंह ‘मिलिअन डॉलर गर्ल’ या मालिकेत झळकला होता. नव्या मालिकेत विक्रमसिंह एका सीनमध्ये गाईचे दूध काढताना दिसणार आहे. एका प्रसंगात त्याला गाईचे दूध काढायचे होते. हा प्रसंग अगदी खराखुरा वाटावा, यासाठी विक्रमसिंहने काय करावे माहितीयं??? त्याने २० दिवस गाईचे दूध कसे काढायचे, यासाठीचे प्रशिक्षण घेतले. याबद्दल विक्रमसिंह म्हणाला, गाईचे दूध काढणे सोपे काम नव्हे. त्यासाठी तुम्हाला त्या गाईची माहिती असणे आणि तिचा विश्वास संपादन करणे गरजेचे असते. याशिवाय गाईचे दूध केव्हा व कसे काढायचे, हे सुद्धा समजायला हवे. मालिकेत माझ्या गाईचे नाव गुणगुण आहे. सर्वप्रथम मी गुणगुणला दहा दिवस रोज चारा-पाणी दिले. ती मला ओळखू लागल्यानंतर २० व्या दिवशी मला यश आलं. गुणगुणच्या लाथा खाव्या लागल्यात का? असे विचारल्यावर विक्रमसिंह मोकळा हसला. नाही, गुणगुण व मी आता मित्र आहोत. सुदैवाने तिच्या लाथा मला खाव्या लागल्या नाहीत, असे त्याने सांगितले.