Exclusive: आवडता मराठी चित्रपट सांगताना अनिल कपूर यांना आली 'लक्ष्या'ची आठवण; म्हणाले - "त्यांची इच्छा होती की..."
By देवेंद्र जाधव | Updated: June 20, 2024 15:56 IST2024-06-20T15:56:05+5:302024-06-20T15:56:33+5:30
लोकमत फिल्मीला 'बिग बॉस ओटीटी 3' निमित्त दिलेल्या खास मुलाखतीत अनिल कपूर यांनी त्यांचा फेव्हरेट मराठी चित्रपट सांगितला. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवणही शेअर केली (laxmikant berde, anil kapoor, bigg boss ott 3)

Exclusive: आवडता मराठी चित्रपट सांगताना अनिल कपूर यांना आली 'लक्ष्या'ची आठवण; म्हणाले - "त्यांची इच्छा होती की..."
अनिल कपूर हे बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते. अनिल यांनी आजवर विविध सिनेमे गाजवले. मग ते 'नायक' असो, 'परिंदा' असो वा काही महिन्यांपुर्वी रिलीज झालेला 'अॅनिमल'. अनिल कपूर यांनी वयाची साठी ओलांडली तरीही फिट अँड फाईन आहेत. अनिल लवकरच 'बिग बॉस ओटीटी 3' च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यानिमित्त 'लोकमत फिल्मी'शी केलेल्या खास बातचीतमध्ये अनिल यांनी त्यांचा आवडता मराठी सिनेमा सांगितला. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डेंची खास आठवण सांगितली आहे.
अनिल कपूर यांचा आवडता मराठी सिनेमा आणि लक्ष्याची आठवण
अनिल कपूर यांना आवडता मराठी सिनेमाबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी 'हमाल दे धमाल' सिनेमाचं नाव घेतलं. याविषयी बोलताना अनिल कपूर म्हणाले, "आवडत्या सिनेमाबद्दल सांगायचं तर हमाल दे धमाल सिनेमाचं मी नाव घेईल. या सिनेमात मी लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत काम केलेलं. मी त्यात काम केलं म्हणून तो माझा फेव्हरेट सिनेमा आहे, असं नाही. लक्ष्मीकांत बेर्डेजी खूप मस्त माणूस होते. त्यांनी मला एकदा फोन केला. लक्ष्मीकांत यांची इच्छा होती की, हमाल दे धमाल मध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारावी. मी लगेच होकार कळवला."
अनिल कपूर पुढे म्हणतात, "लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत आधी मी बेटा सिनेमात काम केलेलं. हमाल दे धमाल पिक्चर सुपरहिट झाला. सिल्व्हर ज्युबिलीचं भाग्य सिनेमाला मिळालं. मी जेव्हा सिनेमा बघितला तेव्हा मलाही खूप मजा आली." अशाप्रकारे अनिल कपूर यांनी लक्ष्याची आठवण जागवली.
A ‘khaas' behind-the-scenes catch up with our amazing Bigg Boss OTT 3 host, @AnilKapoor. #BiggBossOTT3 streaming exclusively on JioCinema Premium starting 21 June, 9 pm.#BBOTT3onJioCinema#BBOTT3#BiggBoss#JioCinemaPremiumpic.twitter.com/RYx7QGInZF
— JioCinema (@JioCinema) June 15, 2024
बिग बॉस ओटीटी 3 कधी सुरु होणार?
लवकरच 'बिग बॉस ओटीटी'चा तिसरा सीझन सुरु होणार आहे. 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान नव्या सीझनची सूत्रं सांभाळणार नाहीये. सलमानऐवजी बॉलिवूडमधले लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी ३' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. Bigg Boss OTT 3 #AbSabBadlega २१ जूनपासून JioCinema Premium वर रात्री ९ वाजता बघू शकता. सर्वांचं लक्ष अनिल कपूर बिग बॉसची सूत्रं कशी सांभाळणार याकडे आहे.