'आई कुठे काय करते'मधील अनिरूद्धला खऱ्या पत्नीसोबत केलेल्या 'या' गोष्टीसाठी वाटतो पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 11:39 AM2021-06-29T11:39:34+5:302021-06-29T11:40:06+5:30
मिलिंद गवळीला पत्नीसोबत केलेल्या त्या वर्तणूकीमुळे आजही पश्चाताप होतो.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्वच पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी घराघरात पोहचला. त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. ५५ वर्षीय मिलिंद गवळी यांची पर्सनॅलिटी तरूणांना लाजवेल अशी आहे. मिलिंद गवळी यांची पत्नी दिपा गवळी या देखील खूप सुंदर आहेत. मिलिंद गवळी यांनी सुलेखा तळवलकरच्या 'दिल के करीब' मुलाखतीत खंत व्यक्त केली होती.
मिलिंद गवळीला पत्नीसोबत केलेल्या त्या वर्तणूकीमुळे आजही पश्चाताप होतो. मराठी, हिंदी आणि मल्याळम सिनेमात झळकलेल्या मिलिंद गवळीच्या मनात असुरक्षिततेची भावना आली होती. आपली पत्नी आपल्यापेक्षा पुढे तर निघून जाणार नाही ना? हा विचार एकेकाळी मिलिंद गवळी यांच्या मनात आला. याच तेव्हाच्या विचाराबद्दल त्यांना आजही वाईट वाटत आहे.
मिलिंद गवळीला एका ऑडिशनकरता बोलवण्यात आले होते. त्यावेळी त्यांची पत्नी देखील होती. कास्टिंग डिरेक्टरने दिपा गवळी यांना पाहून 'तू देखील ऑडिशन दे.' त्यावेळी मिलिंद गवळी यांनी देखील त्यांना प्रोत्साहन दिले. आयडेक्सची जाहिरात दिपा गवळी यांना मिळाली.
शूटिंगच्या पहिल्या दिवशी दिपा गवळीसह मिलिंद आपल्या ३ महिन्याच्या मिथिलाला घेऊन गेले. शूटिंग पूर्ण झाल्यावर दिपा गवळीने आपल्याला हे नाही करायचे. मला सिने क्षेत्रात काम नाही करायचे. हे ऐकल्यावर मिलिंद गवळी यांनी देखील फार लक्ष दिले नाही. ही जर अभिनय क्षेत्रात पुढे गेली तर माझे काही खरे नाही. दोघे एकाच क्षेत्रात असल्यामुळे घरी फार लक्ष देता आले नसते. कुठेतरी ती असुरक्षिततेची भावना त्यावेळी माझ्या मनात आली होती. त्यामुळे मी ही तिला फार प्रोत्साहन दिले नाही आणि तिला पण या क्षेत्रात करिअर करायचे नव्हते.