'अनिरुद्ध नकोसा वाटतो आणि आशुतोष...'; मिलिंद गवळीची 'ती' पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 11:26 AM2022-03-14T11:26:17+5:302022-03-14T11:26:41+5:30
Aai Kuthe Kay Karte: मिलिंद गवळीं (Milind Gawali)ची इंस्टाग्रामवरील लेटेस्ट पोस्ट सध्या खूप चर्चेत आली आहे.
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत सध्या अरुंधती देशमुखांचे घर सोडून भाड्याने स्वतःच्या घरात राहण्यासाठी गेली आहे. दरम्यान आशुतोष देखील देशमुखांच्या घरी जाऊन अरुंधतीवर प्रेम असल्याची कबुली देतो. आता यावर आधारीत अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची सध्या खूप चर्चा होताना दिसते आहे.
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आई कुठे काय करतेचा व्हिडीओ शेअर करून लिहिले की, अनिरुद्ध देशमुखने भाग पाडलं आशुतोष केळकरला त्याचं अरुंधती वरचं प्रेम व्यक्त करायला" चला आता आशुतोष केळकर ने सगळ्यांसमोर आपलं 27 वर्षापासूनचं अरुंधती वरचं प्रेम व्यक्त केलं.
आज अरुंधतीला सुद्धा ऐकल्यावर धक्का बसला, आज अनिरुद्ध जे ओरडून ओरडून सांगत होता तेच खरं झाल्यासारखं वाटलं, पण अनिरुद्ध चारी खरं झालं असलं तरी, काही नाती प्रेमावर आधारित असतात पण त्यात फार गुंतागुंत असते, तिथे काय योग्य , काय अयोग्य , कोण बरोबर कोण चुकीचा हा मुद्दाच नसतो, खरं खोटं नसतं. किती इंटरेस्टिंग आहे हे सगळं, आता अनिरुद्ध चा मुद्दा खरा ठरला, पण तरीसुद्धा सामान्य माणूसाला आशुतोष केळकर खरा वाटतो,त्याच्याविषयी राग वाटत नाही, राग अनिरुद्धचाच येतो, का असं होत असेल बरं, कारण प्रेम करणं अजिबात चुकीचं नाही आहे हे प्रत्येकाला माहिती, त्यामुळे आशुतोषचं अरुंधती वरचं प्रेम कोणालाच खटकत नाही, पण ज्या वेळेला अनिरुद्ध संजना वर प्रेम करत होता ते प्रेम मात्र सगळ्यांना खटकत होतं, बघताना आपण किती वेगळ्या दृष्टिकोनातून या दोन्हीं प्रेमाकडे बघतो, त्यामुळे मला असं वाटतं प्रेम करणारा आणि त्याचं प्रेम रिस्पॉन्सिबल असेल तर ते प्रेम प्रत्येकाला हवहवसं वाटतं ,त्यात काही चुकीचं वाटत नाही, आशुतोष केळकर च प्रेम हे रिस्पॉन्सिबल, किंवा अनकंडिशनल आहे, आणि अनिरुद्ध देशमुखचं प्रेम हे बेजबाबदार किंवा अटींवर आहे, स्वतःच्या स्वार्थापोटी आहे म्हणून ते खूप जास्त खटकत असतं.
त्यांनी पुढे या पोस्टमध्ये म्हटले की, अजून एक महत्त्वाचा मुद्दा, माणूस जर genuine , चांगला असेल , तर त्याचं प्रेम सुद्धा लोकांना आवडतं, माणूस जर अनिरुद्ध सारखा असेल तर त्याचं genuine प्रेम सुद्धा आपल्याला खटकतं. आणि प्रेमामध्ये जर sacrifices असेल त्याग असेल, तर ते सुंदरच वाटतं, आणि
प्रेमामध्ये फक्त स्वार्थ असेल, तर ते वीभत्स , किंवा नकोसं वाटतं. अनिरुद्ध possessive झाला तर आशुतोष Permissive and demanding झाला.
किती भिन्न भूमिका/ characters आहेत अनिरुद्ध आणि आशुतोष च्या, अनिरुद्ध नकोसा वाटतो आणि आशुतोष हवासा वाटतो. आई कुठे काय करते या सिरीयलची हीच तर गंमत आहे, प्रेक्षकांना ते स्वतः दिसतात, ते स्वतःला बघतात, ते स्वतःला अनुभवतात या भूमिकांमध्ये, आयुष्याच्या प्रवासामध्ये कधी माणसं अनिरुद्ध सारखी वागतात तर कधी ते आशुतोष सारखी वाहतात, वेळीच लक्षात आलं, तर सहज आपल्याला भूमिका बदलता येईल, आणि तेच प्रेम पवित्र होऊन जाईल, पण अनिरुद्ध देशमुख कधी त्याची भूमिका बदलतोय याची मी वाट बघतोय.