'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्धने संजनाच्या वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 05:45 PM2021-12-29T17:45:58+5:302021-12-29T18:03:23+5:30
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ((Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सुरु झालीय लगीनघाई.
स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' ((Aai Kuthe Kay Karte) मालिकेत सुरु झालीय लगीनघाई. अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे.याच दरम्यान अनिरुद्धने संजनाला वाढदिवसाच्या सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. संजना म्हणजेच रुपालीचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मिलिंद गवळीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंदने रुपाली सोबतचा फोटो शेअर करत लिहिले, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रूपाली तिचा आदर्श वाक्य (Her moto of life) Love yourself first ...then you will be able to love others,आधी स्वतःवर प्रेम करा.. मग आपल्याला जगावर प्रेम करता येईल . That's so true... Respect yourself first , Take good care of yourself first , then you will be able to take care of others..And respect others.. And she carries herself so elegantly , and beautifully..Happy Birthday Rupali Actually , Normally लोकांचे वाढदिवस असतात पण रूपालीचा वाढमहिना असतो, birthmonth असतो, birthday नाही, पूर्ण डिसेंबर महिना, डिसेंबरच्या एक तारखेपासून 29 तारखेपर्यंत दररोज एक किंवा दोन केक ती कापते, असंख्य तिचे फॅन्स तिला महिनाभर केक पाठवत असतात, डिसेंबर महिन्यात जवळजवळ 40 केक's तिने कापले असतील.तिचा वाढदिवस आमच्या सेटवर कोणीच विसरू शकत नाही, महिनाभर ती सगळ्यांना त्याची आठवण करून देते, I think that is how one should live life, fullest, Life has to be celebrated all the time, You live once So LIVE king size , or according to Rupali , live life Queen Size... आनंद सिनेमा चा डायलॉग आठवतो " बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही." आणि हे रूपाली कडून शिकायला मिळतं, कामाच्या बाबतीत तेवढीच श्रद्धा, वेळेचे महत्व, आपलं काम कसं चांगलं होईल ह्याचा सतत विचार करत रहाणं. जवळजवळ पाचशे एपिसोड्स आम्ही एकत्र काम केलं, आणि असा एकही सीन तिच्याबरोबर चा कधीही Dull, किंवा ज्यात full energy नाही, असा कधीच गेला नाही, सतत ती scene चा विचार , कुठे जागा काढता येतील, तो सीन आणखीन इंटरेस्टिंग कसा करता येईल याचा विचार, बरं संजना है कॅरेक्टर फार सोपं नाहीये, पहिल्या एपिसोड पासून ते कधीच सोपं नव्हतंच, पण रुपालीने ते कॅरेक्टर खूपच वेगळ्या level नेऊन ठेवलं आहे. आणि दोघेही भिन्न स्वभावाच्या आहेत , कॅरेक्टर संजना आणि प्रत्यक्ष रुपाली. आज वाढदिवसाच्या रुपाली भोसले ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद, आयुष्याचा पुढचा प्रवास यशस्वी आणि सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
या मालिकेत संजना आणि अनिरुद्ध दोघेही नकारात्मक भूमिका साकारता येत. 'आई कुठे काय करते' ((Aai Kuthe Kay Karte) ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. संजना आणि अनिरुद्ध दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात.