मुनव्वर फारुखीची गर्लफ्रेंड अन् अंजली अरोरा आमनेसामने; एकमेकींना पाहून दिली थक्क करणारी रिअॅक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:38 IST2022-05-20T18:37:13+5:302022-05-20T18:38:42+5:30
Anjali arora: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाजिल आणि अंजली एकमेकींना भेटतात.

मुनव्वर फारुखीची गर्लफ्रेंड अन् अंजली अरोरा आमनेसामने; एकमेकींना पाहून दिली थक्क करणारी रिअॅक्शन
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचा लॉक अप( lock up) हा शो अलिकडेच संपला. मात्र, या शोमुळे अनेक सेलिब्रिटी चर्चेत आले. त्यातलीच एक जोडी म्हणजे अंजली अरोरा आणि मुनव्वर फारुकी. लॉकअपमध्ये या दोघांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चा रंगल्या होत्या. या दोघांची जवळीक चांगलीच वाढली होती. मात्र, हा शो संपल्यानंतर मुनव्वरचं एक वेगळंच सत्य समोर आलं. खऱ्या आयुष्यात मुनव्वर एका मुलीला डेट करत असल्याचं पाहायला मिळालं. ज्यामुळे अंजीला प्रचंड धक्का बसला. इतकंच नाही तर एका कार्यक्रमात या दोघी एकमेकींच्या समोरासमोर आल्या आणि त्यांनी थक्क करणारी रिअॅक्शन दिली.
लॉक अप हा शो संपल्यानंतर मुनव्वरने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये त्याच्यासोबत एक मुलगी दिसत होती. या मुलीला पाहिल्यावर अनेकांनी तिच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या मुलीचं नाव नाजिल असून मुनव्वर तिला डेट करत असल्याचं समोर आहे. विशेष म्हणजे नाजिल आणि अंजली पहिल्यांदाच एका पार्टीत समोरासमोर आले आणि त्यांनी दिलेली प्रतिक्रिया थक्क करणारी होती.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाजिल आणि अंजली एकमेकींना भेटतात. विशेष म्हणजे सुरुवातीला या दोघी एकमेकींकडे पाहातदेखील नाहीत. मात्र, फोटोग्राफर्सने त्यांना कॅप्चर केल्यानंतर दोघींनीही हसतहसत एकमेकींना मिठी मारत फोटो काढून घेतला. त्यांचं हे वागणं पाहून उपस्थित साऱ्यांनाच धक्का बसला. कारण, अलिकडेच अंजलीविषयी बोलण्यात काहीही रस नाही, असं नाजिलने एका मुलाखतीत सांगितलं होतं.