'कच्चा बदाम गर्ल' अंजली अरोराला अश्रू अनावर, MMS लीक प्रकरणावर दिलं होतं स्पष्टीकरण; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:00 IST2025-03-03T09:58:26+5:302025-03-03T10:00:00+5:30
'लॉकअप' शोमधून आणि कच्चा बदाम व्हायरल गाण्यामुळे अंजलीला प्रसिद्धी मिळाली होती.

'कच्चा बदाम गर्ल' अंजली अरोराला अश्रू अनावर, MMS लीक प्रकरणावर दिलं होतं स्पष्टीकरण; म्हणाली...
इंटरनेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अंजली अरोरा (Anjali Arora) अनेक कारणांमुळे चर्चेत असते. कंगना राणौतच्या 'लॉकअप' शोमधून ती प्रसिद्धीझोतात आली होती. तसंच तिला 'कच्चा बदाम'या व्हायरल गाण्यामुळेही लोकप्रियता मिळाली होती. मात्र नंतर अंजलीचा एक एमएमएस लीक झाला आणि ती चर्चेत आली. यानंतर तिला मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं. तिने तो फेक असल्याचं स्पष्टीकरणही दिलं होतं. एका मुलाखतीत एमएमएस प्रकरणावर बोलताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
अंजली अरोरा म्हणाली, "मी लॉकअप शोमध्ये गेले तेव्हा वेबसीरिज, म्युझिक व्हिडिओजसाठीही मला साईन करण्यात आलं होतं. मात्र मी शोमध्ये गेल्याने ते झालं नाही. बाहेर आल्यानंतर मी ते सगळं करणार होते. पण बाहेर आल्यानंतर मला कळलं की माझा डीप फेक व्हिडिओ बनवण्यात आला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांनी मला यावर काहीही विचारलं नाही. पण जेव्हा मी एका पत्रकार परिषदेत होते मला कळलं की माझा असा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावर प्रश्न विचारल्यानंतर मला काहीच समजलं नाही. मी उत्तर न देता पुढतचा प्रश्न असं म्हटलं. पण जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा मला विश्वासच बसत नव्हता की हे माझ्यासोबत झालंय? त्यानंतर माझं मानसिक, शारिरीकरित्या मी ट्रॉमामध्ये होते. मी कित्येक दिवस घराबाहेरही पडत नव्हते. माझे मित्र, कुटुंबातील सदस्य माझ्यासोबत होते म्हणून मी त्यातून बाहेर पडू शकले."
अंजलीच्या स्पष्टीकरणानंतरही नेटकऱ्यांनी मात्र तिला ट्रोलच केलं. 'तो व्हिडिओ हिने स्वत:च व्हायरल केला असेल', 'व्हिडिओ फेक नाही तर १०० टक्के खरा होता' अशा कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.
अंजली अरोराने खूप कमी वयात प्रसिद्धी मिळवली. तिने स्वत:चं घरही घेतलं. अंजली आकाश संसलवालला डेट करत आहे. दोघंही लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. अंजलीने आकाशच्या वाढदिवसाला त्याला आलिशान घरही गिफ्ट केलं होतं .