Bigg Boss 17 शोमधील पती विकी जैनची लोकप्रियता पाहून इनसिक्योर झाली अंकिता, सलमानकडे केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 02:06 PM2023-11-18T14:06:18+5:302023-11-18T14:06:49+5:30

Bigg Boss 17 : सध्या बिग बॉस १७ मध्ये अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात काहीही चांगले चालले नाही. आता सलमानने अंकिताशी याबाबत चर्चा केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने एक धक्कादायक खुलासा केला आहे.

Ankita became insecure after seeing her husband Vicky Jain's popularity in the Bigg Boss 17 show, revealed to Salman | Bigg Boss 17 शोमधील पती विकी जैनची लोकप्रियता पाहून इनसिक्योर झाली अंकिता, सलमानकडे केला खुलासा

Bigg Boss 17 शोमधील पती विकी जैनची लोकप्रियता पाहून इनसिक्योर झाली अंकिता, सलमानकडे केला खुलासा

अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस १७ (Bigg Boss 17) मध्ये काही अडचणींचा सामना करत आहे. शोमध्ये ती सतत तिचा पती विकी जैन(Vicky Jain)वर रागावताना दिसत आहे. ती म्हणते की विकी तिला वेळ देत नाही. आता या मुद्द्यावर सलमान खानने अंकिताला सवाल केला आहे. वीकेंडमध्ये सलमानने अंकिताला थेरपीमध्ये बोलावले आणि तिच्याशी या विषयावर बोलून तिच्या समस्येवर तोडगा काढला. 

सलमानने विचारले की, जेव्हा विकी त्याचा गेम खेळत आहे तर तू का खेळत नाहीस. तसेच सलमानने अंकिताला विचारले की, विकी सर्वत्र दिसत असल्याने तिला काही अडचण येत आहे का? यानंतर सलमानने थेट अंकिताला सांगितले की, शोमध्ये मिळणारे लक्ष आणि लोकप्रियता पाहून तुला तुझ्या पतीचा हेवा वाटतो. यावर हसत अंकिता म्हणाली की, कदाचित तसे असेल. अंकिताच्या या कबुली जबाबावर आता सोशल मीडिया यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते तिला जोरदार ट्रोल करत आहेत. 

अंकिता आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
एका यूजरने लिहिले की, अंकिता दीदी, इतर स्पर्धक असुरक्षित होतील का, तिला स्वतःच्या नवऱ्याचा हेवा वाटतो. दुसर्‍या यूजरने लिहिले की, अंकिताला शोमध्ये अधिक लक्ष हवे आहे...तिला शोमध्ये तिच्या पतीला चमकू द्यायचे नाही. ती तिच्या पतीसोबत खूप असुरक्षित आहे...ती खूप दयनीय आहे. आणखी एका युजरने लिहिले की, अंकिता लोखंडे खूप असुरक्षित आणि मत्सरी आहे. तिने तिच्या नवऱ्यासाठी आनंदी असले पाहिजे पण नाही. तिने आधीच सांगितले आहे की, तिने विकीला शोमध्ये स्वतःसाठी आणले होते. कठपुतली बनवत राहायची होती पण आता तो तसे करत नाही तर अंकिताला हे बघवत नाही.

Web Title: Ankita became insecure after seeing her husband Vicky Jain's popularity in the Bigg Boss 17 show, revealed to Salman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.