Ankit Gupta : 'किमान वरवर तरी स्पर्श करु दे..' बिग बॉस फेम अंकित गुप्ता कास्टिंग काऊचचा शिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:10 IST2023-02-02T15:08:00+5:302023-02-02T15:10:07+5:30
मनोरंजनसृष्टीत कास्टिंग काऊच काही नवीन नाही.

Ankit Gupta : 'किमान वरवर तरी स्पर्श करु दे..' बिग बॉस फेम अंकित गुप्ता कास्टिंग काऊचचा शिकार
Ankit Gupta : मनोरंजनसृष्टीत कास्टिंग काऊच काही नवीन नाही. अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. त्याशिवाय कामही मिळत नाही असेही अनुभव अनेकांना आले आहेत. असाच एक अनुभव बिग बॉस फेम अंकित गुप्ताने नुकताच शेअर केला आहे.
अंकित गुप्ताने एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा किस्सा सांगितला आहे, 'इथे तर तडजोड करावीच लागते. नाहीतर सहज काम मिळत नाही. आम्ही आतापर्यंत अनेक लोकांना लॉंच केले आहे. त्या लोकांची नावंही त्याने घेतली' असं अंकित म्हणाला.'
तो पुढे म्हणाला,' मला पुरुषांमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आणि असला तरी मी ते करणार नाही असं मी त्याला सांगितलं. तो अत्यंत वाईट अनुभव होता. नकार दिल्यानंतरही वरवर तरी स्पर्श करु दे असं तो म्हणाला. वरचेवर का होईना स्पर्श करु दे असं तो म्हणाला आणि मला धक्काच बसला.
अंकित गुप्ता बिग बॉस १६ मधून प्रसिद्धीझोतात आला होता. त्याचा लवकरच एक म्युझिकल ड्रामा येणार आहे.