पुन्हा टीव्हीवर येतेयं सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची हिट जोडी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 09:42 IST2018-09-02T09:37:54+5:302018-09-02T09:42:16+5:30
एकेकाळची छोट्या पडद्यावरची सर्वाधिक हिट जोडी कुठली तर अर्चना-मानव अर्थात सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची.

पुन्हा टीव्हीवर येतेयं सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची हिट जोडी!
एकेकाळची छोट्या पडद्यावरची सर्वाधिक हिट जोडी कुठली तर अर्चना-मानव अर्थात सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने सुशांत व अंकिता दोघेही घराघरात पोहोचली. त्यांच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीने छोट्या पडद्यावर आग लावली. ही आॅनस्क्रीन केमिस्ट्री इतकी शानदार होती की, पर्सनल लाईफमध्येही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. दिवसांगणिक त्यांचे प्रेम बहरले. दोघेही लग्न करणार, इथपर्यंत बातमी कानावर आली. पण तोपर्यंत सुशांत छोट्या पडद्यावरचा नाही तर मोठ्या पडद्याचा स्टार झाला होता. अंकिता मात्र कुठेच नव्हती. या काळात दोघांचेही ब्रेकअप झाले. पण आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. अर्थात रिअल लाईफमध्ये नाही तर रिल लाईफमध्ये. सुशांत व अंकिता अर्थात अर्चना- मानव पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतत आहे. होय, या दोघांची सर्वाधिक लोकप्रीय ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका पुन्हा एकदा टेलिकास्ट केली जाणार आहे. संबंधित चॅनलने नुकतीच ही घोषणा कली. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आम्ही ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘जोधा अकबर’ हे दोन्ही शो पुन्हा टेलिकास्ट करणार आहोत, असे संबंधित चॅनलने स्पष्ट केले आहे.
‘काय पो छे’ आणि ‘एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’मुळे बॉलिवूडमध्ये लोकप्रीय झालेला सुशांत सध्या जाम बिझी आहे. ‘केदारनाथ’ हा त्याचा चित्रपट रिलीज होतोय. यात त्याच्या अपोझिट सारा अली खान दिसणार आहे. याशिवाय ‘किज्जी और मनय’, ‘सोन चिरैय्या’ यातही सुशांत बिझी आहे. अंकिताचे म्हणाल तर लवकरच ती ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. यात ती झलकारी बाईची भूमिका साकारतेय.