'स्मार्ट जोडी' ठरलेले विकी-अंकिता झाले लखपती; ट्रॉफीसह मिळालं इतक्या लाखांचं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:43 IST2022-06-03T16:43:05+5:302022-06-03T16:43:29+5:30
Ankita lokhande and vicky jain: विजेत्या जोडीला ट्रॉफीसोबत किती लाखांचं बक्षीस मिळालं हीदेखील नवी चर्चा रंगली आहे.

'स्मार्ट जोडी' ठरलेले विकी-अंकिता झाले लखपती; ट्रॉफीसह मिळालं इतक्या लाखांचं बक्षीस
काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर स्मार्ट जोडी (Smart Jodi) हा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या शोमध्ये कलाविश्वातील अनेक लोकप्रिय जोड्यांनी सहभाग घेतला होता. अलिकडेच या शोचा ग्रँड फिनाले सोहळा संपन्न झाला असून या शोच्या पहिल्या पर्वाला त्याची पहिली विजेती जोडी मिळाली आहे. लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विक्की जैन (Vicky Jain) यांनी स्मार्ट जोडी हा खिताब पटकावला आहे. त्यामुळे सध्या या जोडीची सोशल मीडियावर चर्चा आहे. इतकंच नाही तर या विजेत्या जोडीला ट्रॉफीसोबत किती लाखांचं बक्षीस मिळालं हीदेखील नवी चर्चा रंगली आहे.
स्मार्ट जोडी हा शो फ्रेबवारीमध्ये सुरु झाला होता. या शोच्या सुरुवातीला १० सेलिब्रिटी जोड्यांनी सहभाग घेतला. यात प्रत्येक जोडीने आपल्या पार्टनरसोबत असलेली उत्तम केमिस्ट्री आणि परफॉर्मन्सच्या आधारावर प्रेक्षकांचं मन जिंकायचा प्रयत्न केला. परंतु, अंकिता आणि विकीने या शोमध्ये बाजी मारली.
शो जिंकताच विकी-अंकिता झाले लखपती
स्मार्ट जोडी हा शो जिंकल्यानंतर विकी आणि अंकिताला ट्रॉफी देत सन्मानित करण्यात आलं. सोबतच त्यांना २५ लाख रुपयांची रोख बक्षीसाची रक्कमही देण्यात आली. यावेळी अंकिताने तिच्या भावना व्यक्त करत या संपूर्ण प्रवासाविषयी भाष्य केलं.
"माझ्या साथीदाराशिवाय या यशापर्यंत पोहोचणं अशक्य होतं. आम्हा एक होतो आणि शेवटपर्यंत एकत्रच खेळलो. ही ट्रॉफी जिंकणं आमच्यासाठी फार गरजेचं होतं कारण, हा एक खास ऋणानुबंध होता. जो आमच्या नात्यासाठी फार गरजेचा होता. या शोमुळे आमचं नातं आणखीनच घट्ट झालं. ४ महिन्यांमध्ये झालेली आमची ही सर्वात बेस्ट अॅनिव्हर्सरी आहे. हे आम्ही दोघांनी एकमेकांनी दिलेलं जणू एक गिफ्टच आहे. या विजयामुळे आमच्यासह आमचे कुटुंबीयदेखील प्रचंड आनंदात आहे", असं अंकिता म्हणाली.