स्वतःच्या लग्नात एवढी ओव्हरअॅक्टिंग कोण करते का?साखरपुड्याचा Video व्हायरल होताच अंकिता लोखंडे झाली ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 06:09 PM2021-12-13T18:09:40+5:302021-12-13T18:14:05+5:30
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत उद्या 14 डिसेंबरच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधणार आहे.
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिचा बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत उद्या 14 डिसेंबरच्या मुहूर्तावर लग्नगाठ बांधणार आहे.तिच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांना सुरूवात झाली असून तिचे मेहंदी सोहळ्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता तिच्या साखरपुड्याचे व्हिडीओही इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. लग्ननाआधी अंकिता व विकीचा साखरपुडा झाला. या एंगेजमेंट पार्टीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ खूपच सुंदर आहे पण तरीही विकी आणि अंकिता यांना प्रचंड ट्रोल केले जात आहे.
विरल भयानीने त्याच्या अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता काळ्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये तर विकी ब्लॅक शर्टसोबत सिल्वर रंगाचे ब्लेझर घातलेले दिसतेय. विक्की अंगठी घालताच अंकिता लोखंडे ओरडू लागते आणि आनंदाच्या भरात प्रतिक्रिया देऊ लागते.
अंकिता लोखंडेला केलं जातंय ट्रोल
अंकिता लोखंडेचा हा व्हिडीओ व्हायरल होताच तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल केलं जातंय. सोशल मीडिया यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, 'ही खूप जास्त ओव्हरअॅक्टिंग करतेय.' त्याचप्रमाणे दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, 'प्रत्येक व्हिडिओमध्ये ओव्हरअॅक्टिंग.' एका युजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, 'स्वतःच्या लग्नात एवढी ओव्हरअॅक्टिंग कोण करते का?'
आज 13 तारखेला अंकिता व विकीच्या लग्नाचा हळदी समारंभ होणार आहे. शिवाय रात्री इंडो- वेस्टर्न म्युझिकच्या तालावर संगीत सोहळा रंगणार आहे.
विकीचा होणारा पती विकी जैन हा मोठा बिझनेसमॅन आहे. तो गुजराती असला तरीही लग्नाचे सर्व विधी ही महाराष्ट्रीयन परंपरेनुसारच होणार आहे. रॉयल ट्रेडिशनल स्प्लेंडर अशी लग्नाची थीम आहे.