अपयश पचवता येईना! Bigg Boss मधून OUT झाल्यामुळे अंकिता नाराज; चेहरा पडला, रंग उडाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 11:04 AM2024-01-29T11:04:43+5:302024-01-29T11:05:05+5:30

Ankita lokhande: अंकिताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात तिचा चेहरा पूर्णपणे उतरल्याचं दिसून येत आहे.

ankita-lokhande-came-out-with-a-sad-face-after-the-bigg-boss-17-grand-finale-people-taunts | अपयश पचवता येईना! Bigg Boss मधून OUT झाल्यामुळे अंकिता नाराज; चेहरा पडला, रंग उडाला!

अपयश पचवता येईना! Bigg Boss मधून OUT झाल्यामुळे अंकिता नाराज; चेहरा पडला, रंग उडाला!

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहिलेला बिग बॉस (bigg boss) या शोचं नुकतंच 17 वं पर्व पार पडलं. या पर्वात मुनव्वर फारुकी हा विजेता ठरला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या पर्वात अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) विजयी होणार असा अनेक जणांचा ठाम विश्वास होता. मात्र, ट्रॉफीच्या अगदी जवळ असतानाच अंकिताला या शोमधून बाहेर पडावं लागलं. त्यामुळे ती नाराज झाली आहे. सध्या सोशल मीडियावर अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे.

विरल भय्यानी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर अंकिताचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बिग बॉस 17 चा विजेता घोषित झाल्यानंतर पापाराझी प्रत्येक बिग बॉस सदस्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढे सरसावले.यावेळी अंकिताने कोणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता थेट तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेली. इतकंच नाही तर तिच्या आईने सुद्धा प्रतिक्रिया देणं टाळलं. त्यामुळे नेटकऱ्यांनी आता तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

काय म्हणाले नेटकरी?

'मुनव्वर आणि मन्नाराने तिचा पराभव केल्यामुळे नाराज झाली वाटतं', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'बिग बॉसची ट्रॉफी मिळाली नाही त्यामुळे वाईट वाटतंय का?', 'अपयश पचवता येत नाहीये हिला', 'अपयश जिव्हारी लागलंय', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

Web Title: ankita-lokhande-came-out-with-a-sad-face-after-the-bigg-boss-17-grand-finale-people-taunts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.