Ankita Lokhande : अगं कलश कुठे आहे? अंकिता लोखंडेने असा साजरा केला गुढीपाडवा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 05:08 PM2023-03-22T17:08:37+5:302023-03-22T17:10:19+5:30

Ankita Lokhande : होय, अंकिताने गुढीपाडवा साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. 

Ankita Lokhande Celebrated Gudhipadwa 2023 Netizens Troll | Ankita Lokhande : अगं कलश कुठे आहे? अंकिता लोखंडेने असा साजरा केला गुढीपाडवा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Ankita Lokhande : अगं कलश कुठे आहे? अंकिता लोखंडेने असा साजरा केला गुढीपाडवा, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

googlenewsNext

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला चर्चेत राहणं चांगलंच जमतं. या ना त्या कारणानं ती सतत चर्चेत असते. कधी ग्लॅमरस फोटो, कधी नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक व्हिडीओ ती शेअर करत असते. सध्या तिच्या अशाच एका व्हिडीओची चर्चा आहे. होय, अंकिताने गुढीपाडवा साजरा करतानाचा व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले. 

अंकिताने पती विकी जैनसोबत गुढीपाडवा साजरा केला. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टावर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत जोडपं गुढीची पूजा करत आहे. पण अंकिता पूजा करत असलेल्या गुढीवर कलशच नाहीये. नेमकी हीच गोष्ट नेटकऱ्यांना खटकली आणि अनेकांनी यावरून अंकिताला ट्रोल करायला सुरूवात केली.  गुढीवर कलश नाहीये, असं एका युजरने लिहिलं. अगं कलश कुठे आहे? असं एकाने कमेंट करत विचारलं. “कलश तर नाही नाही आणि घरात काेण गुढी उभारतं? असा सवाल एका युजरने केला.  गुढीला कलश असतो, पण एवढं माहित नसेल तर तू कसली मराठी? असं एका युजरने तिला सुनावलं.

 अंकिता व विकी जैन यांनी डिसेंबर २०२१ रोजी लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे. 

Web Title: Ankita Lokhande Celebrated Gudhipadwa 2023 Netizens Troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.