पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा, अंकिताचा बिकिनी फोटो पाहून भडकले सुशांतचे चाहते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 15:41 IST2021-02-17T15:37:11+5:302021-02-17T15:41:34+5:30
Ankita lokhande got trolled by sushant singh rajput fans : अंकिताचा बिकिनीमधला फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा, अंकिताचा बिकिनी फोटो पाहून भडकले सुशांतचे चाहते
अंकिता लोखंडेने ब्लॅक मोनोकिनीमधील काही बोल्ड फोटो इस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती पूलमध्ये मस्ती करताना दिसते आहे. अभिनेत्रीची हे फोटो सुशांतच्या चाहत्यांना फारसे आवडले नाहीत.
अंकिता लोखंडेने तिचे पूलमध्ये एन्जॉय करतानाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिता काळ्या मोनोकिनीमध्ये दिसली आहे. मात्र अंकिताच्या या फोटोवर सुशांतसिंग राजपूतच्या चाहत्यांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अंकिताने काळ्या मोनोकिनीसह आपलं फोटो करताना तिने लिहिले, "इतके सोपे होऊ देऊ नका की कोणीही येईल आणि तुमचा शोध घेईल. "
सुशांतच्या फॅन्सनी केलं पुन्हा ट्रोल
अंकिताच्या या फोटोवर सुशांतसिंग राजपूतचे चाहते तिला ट्रोल करत आहेत. एकाने लिहिले आहे - सुशांतच्या नावाने खूप प्रसिद्धी मिळवते आहेस, तर कोणी लिहिले आहे - आपल्याकडे इंस्टा पोस्टशिवाय दुसरा कोणताही प्रोजेक्ट नाही.
अंकिता लोखंडे विकी जैनसह असलेल्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे. सध्या दोघे मनालीमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतायेत. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे 2016 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले होते.