Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचं नवं घर पाहाल तर पाहातच राहाल, हटके स्टाईलमध्ये शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:44 IST2022-07-01T13:41:42+5:302022-07-01T13:44:43+5:30
Ankita Lokhande & Vicky Jain New Home : अंकिताने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या स्टाईलमध्ये आपल्या नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत अंकिताने स्मृती इराणी यांची हुबेहूब कॉपी केली आहे.

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेचं नवं घर पाहाल तर पाहातच राहाल, हटके स्टाईलमध्ये शेअर केला व्हिडीओ
Ankita Lokhande & Vicky Jain New Home : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande ) सतत या ना त्या कारणानं चर्चेत असते. सध्या चर्चा आहे ती तिच्या नव्या घराची. होय, अंकिताने गेल्यावर्षी 14 डिसेंबरला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत ( Vicky Jain) लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर आता ती व विकी दोघंही नव्या घरात शिफ्ट झाले आहेत.
अंकिता व विकीचं हे घर पाहाल तर पाहातच राहाल. अंकिताने ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेच्या स्टाईलमध्ये आपल्या नव्या घराची झलक दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत अंकिताने स्मृती इराणी यांची हुबेहूब कॉपी केली आहे.
ज्या पद्धतीने मालिकेत स्मृती इराणी मालिकेच्या सुरूवातीला घराचा दरवाजा उघडून प्रत्येक सदस्याची ओळख करून देते, अगदी त्याच पद्धतीने अंकिताने सासू सासरे, दीर, जाऊ, नवरा आणि संपूर्ण कुटुंबाची ओळख करून दिली आहे. सोबत नव्या घराची झलकही दाखवली आहे. अंकिताचं नवं घर कमालीचं सुंदर आणि अलिशान आहे. नुकतीच तिच्या या नव्या घरी गृहप्रवेशाची पूजा झाली. यावेळी अंकिताच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा आहे.
विकी आणि अंकिताने दोन वर्षांपूर्वी मुंबईत नवीन घर घेतलं होतं. पण कोरोना महामारीमुळे काम पूर्ण न झाल्यामुळे ते त्यांच्या घरी शिफ्ट होऊ शकले नाहीत. आता मात्र ती व विकी या नव्या घरात शिफ्ट झाले आहेत.
गृहप्रवेश झाल्यानंतर अंकिताने आपल्या सेलिब्रेटी मित्र-मैत्रिणींसाठी एक खास पार्टी ठेवली होती. यामध्ये राहुल वैद्य, दिशा परमार,अली गोनी, पवित्र रिश्ता मालिकेतील सहकलाकार यांच्यासोबत अनेक सेलिब्रेटी उपस्थित होते. या सर्व सेलेब्रेटींनी आपल्या सोशल मीडियावर अंकिताच्या नव्या घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते.