Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या घरी हलणार पाळणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:59 AM2022-07-19T10:59:53+5:302022-07-19T11:04:25+5:30
Ankita Lokhande pregnant: अंकिता व विकी जैन यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झालेत. याचं झक्कास सेलिब्रेशनही झालं आणि पाठोपाठ एक गुडन्यूज येऊन धडकली. होय, अंकिता लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे.
Ankita Lokhande pregnant: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. नुकतेच अंकिता व तिचा पती विकी जैन (Vicky Jain) यांच्या लग्नाला सहा महिने पूर्ण झालेत. याचं झक्कास सेलिब्रेशनही झालं आणि पाठोपाठ एक गुडन्यूज येऊन धडकली. होय, अंकिता लवकरच आई होणार असल्याची चर्चा आहे. अद्याप अंकिताने अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही. पण राखी सावंतने या अंकिताच्या प्रेग्नंसीची बातमी कन्फर्म केली आहे.
एका मुलाखतीत राखी सावंत यावर बोलली. अंकिता व विकी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. मी आशा करते की, अंकिता लवकरच ही गुडन्यूज कन्फर्म करेल, असं राखी सावंत म्हणाली.
अंकिताने आपल्या लग्नाच्या 6 मंथ अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत अंकिताचा बेबी बम्प दिसत असल्याचा दावा चाहत्यांनी केला आहे. यावरून अंकिता प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत. अद्याप अंकिता वा विकी जैन यापैकी कुणीही प्रेग्नंसीच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. अंकिताकडे खरंच गुडन्यूज आहे की ही निव्वळ अफवा आहे, हे लवकर कळेलच.
अंकिता व विकी जैन यांनी गतवर्षी 14 डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती. अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.
सध्या विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याची ही कंपनी कोल ट्रेडिंग, वॉशरी, लॉजेस्टिक, पॉवरप्लान्ट, रिअल इस्टेट व डायमंडचा व्यवसाय करते. रिपोर्टनुसार, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचा फर्निचरचं शोरूमपासून डेंटल इन्स्टिट्यूटपर्यंत अनेक क्षेत्रात मोठा दबदबा आहे. शिक्षण क्षेत्रातही जैन कुटुंबानं मोठा पैसा लावला आहे. विकीचे वडील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकीएक आहेत. शिवाय एका प्री-स्कूलमध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचं कळतं. नवीन पिढीतील विकी आता क्रीडा क्षेत्रातही उतरला आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे.