सुशांतच्या आठवणीत स्टेजवरच अंकिता लोखंडेचे डोळे आले भरून, म्हणाली - 'पवित्र नहीं, अमर रिश्ता है हमारा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 12:34 PM2020-12-18T12:34:29+5:302020-12-18T12:37:36+5:30

झी रिश्ते अवॉर्डचं प्रसारण या वर्षाच्या शेवटच्या रविवारी म्हणजे २७ डिसेंबरला होणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटींगवेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्री अंकिता लोखंडेवर खिळल्या होत्या.

Ankita Lokhande remembering Sushant Singh Rajput in an award function | सुशांतच्या आठवणीत स्टेजवरच अंकिता लोखंडेचे डोळे आले भरून, म्हणाली - 'पवित्र नहीं, अमर रिश्ता है हमारा'

सुशांतच्या आठवणीत स्टेजवरच अंकिता लोखंडेचे डोळे आले भरून, म्हणाली - 'पवित्र नहीं, अमर रिश्ता है हमारा'

googlenewsNext

झी टीव्हीवर येत्या २७ डिसेंबरला 'झी रिश्ते अवॉर्ड' सोहळा दाखवला जाणार आहे. लॉकडाऊनमध्ये झी ने जुलैमध्ये मालिकांचं शूटींग सुरू केलं होतं. चॅनलने काही नवीन शो सुद्धा सादर केलेत. आता वर्षभरात या मालिकांसाठी मेहनत घेणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

झी रिश्ते अवॉर्डचं प्रसारण या वर्षाच्या शेवटच्या रविवारी म्हणजे २७ डिसेंबरला होणार आहे. या कार्यक्रमाच्या शूटींगवेळी सर्वांच्या नजरा अभिनेत्री अंकिता लोखंडेवर खिळल्या होत्या. अंकिता या एक खास डान्स परफॉर्मन्स करणार आहे.  

या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांना एकाच छताखाली आपल्या फेवरेट स्टार्सना बघण्याची संधी मिळणार आहे. यादरम्यान कलाकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. त्यासोबतच अनेक कलाकार जबरदस्त परफॉर्मन्स करणार आहेत. 'पवित्र रिश्ता' मालिकेची अभिनेत्री अंकिता लोखंडे या सोहळ्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला ट्रिब्यूट देणार आहे. 

शूटींग दरम्यान अंकिता तिच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतील भूमिका म्हणजे अर्चना बनून स्टेजवर आली आणि या मालिकेच्या गाण्यावर तिने  परफॉर्म केलंय. यादरम्यान अंकिताने सुशांत सिंह राजपूतच्या काही गाण्यांवर डान्स केला. यादरम्यान ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. सुशांत सिंह राजपूतबाबत बोलताना अंकिता लोखंडे म्हणाली की, “पवित्र नहीं, अमर रिश्ता है हमारा। हम सभी तुम्हें बहुत मिस करते हैं सुशांत।”
 

Web Title: Ankita Lokhande remembering Sushant Singh Rajput in an award function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.