मोहे रंग लगा दे रे,जेव्हा अंकिता लोखंडे बॉयफ्रेंडच्या पाया पडून घेते आशीर्वाद !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:29 PM2021-03-30T13:29:38+5:302021-03-30T13:35:05+5:30

Ankita seeks blessing from boyfriend. रंग लावून झाल्यानंतर अंकिताने विकीचे पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचे दिसते

Ankita Lokhande requests her boyfriend's blessing for applying her colours, says "Mohe rang laga de re"falls at the feet of her boyfriend Blessings! | मोहे रंग लगा दे रे,जेव्हा अंकिता लोखंडे बॉयफ्रेंडच्या पाया पडून घेते आशीर्वाद !

मोहे रंग लगा दे रे,जेव्हा अंकिता लोखंडे बॉयफ्रेंडच्या पाया पडून घेते आशीर्वाद !

googlenewsNext

अंकिता लोखंडे कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. आता तर ती जे काही करते त्यावर नेटिझन्सचेही बारकाईने लक्ष असते. नुकतेच अंकिताने बॉयफ्रेंड विकी जैनसह धुळवड साजरी करताना दिसली.यात दोघेही एकमेकांना रंग लावत आहेत.रंग लावून झाल्यानंतर अंकिताने विकीचे पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतल्याचे दिसते. अनेकांनी अंकितला यावरही ट्रोल करायला सुरुवात केली आहे. तिचा या व्हिडिओ वर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.अंकिताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.



सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता अचानक चर्चेत आली होती. सुशांत व अंकिता सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते.


अंकिता अनेक वेळा ट्रोल होत असते.तिने कुठलाही फोटो शेअर केला की सुशांतचे फॅन्स तिला ट्रोल करत असतात. त्याच्या मृत्यूला अंकिताच जबाबदार आहे, असा दावा करत सुशांतचे फॅन्स अंकिताला ट्रोल करतात. मात्र अंकितानेही अनेक वेळा त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय.


मी नाही, त्यानं मला सोडलं...! सुशांतच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली

मी इथे कोणावर आरोप करत नाहीये. पण माझी कहाणी कोणालाच ठाऊक नाही. सुशांतला काय हवे होते, हे त्याने पक्के ठरवले होते. त्याला करिअरमध्ये पुढे जायचे होते आणि म्हणून माझ्याऐवजी त्याने करिअर निवडले आणि पुढे गेला. तो तर पुढे निघून गेला.

पण  त्यानंतर अडीच वर्षे मी काय काय सहन केले, हे मलाच ठाऊक़ मी बेडवर नुसते पडून असायचे. मी आता काय करू? आत्महत्या करू का? असे प्रश्न सतत डोक्यात सुरु राहायचे. लोक येऊन मला सुशांतसोबतचे फोटो डिलीट करायला, घरातून हटवायला सांगायचे. पण मला वेळ द्या, यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ हवाये, असे मी त्यांना सांगायचे.

Web Title: Ankita Lokhande requests her boyfriend's blessing for applying her colours, says "Mohe rang laga de re"falls at the feet of her boyfriend Blessings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.