पतीसोबतचे बेडरुममधले फोटो व्हायरल झाल्यानं ट्रोल झाली अंकिता लोखंडे, नेटकरी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 13:47 IST2023-01-17T13:40:54+5:302023-01-17T13:47:47+5:30
अलीकडेच अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत मकर संक्रांती साजरी केली, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

पतीसोबतचे बेडरुममधले फोटो व्हायरल झाल्यानं ट्रोल झाली अंकिता लोखंडे, नेटकरी म्हणाले...
Ankita Lokhande Vicky Jain Romantic Photos: टीव्हीच्या आवडत्या कपलपैकी एक असलेल्या अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे बेडरूमचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा पती विकी जैनसोबतचे फोटो शेअर करत असते.
अलीकडेच अंकिता लोखंडेने पती विकी जैनसोबत मकर संक्रांती साजरी केली, ज्याचे फोटो अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा हँडलवर 16 जानेवारी 2023 रोजी शेअर केले होते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अंकिता लोखंडे आणि विकी जैन रोमँटिक होताना दिसले. त्यांचं बेडरूमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
एका फोटोत अंकिता लोखंडे आपल्या पतीच्या मांडीवर बसलेली दिसली, तर दुसर्या फोटोत विकी जैन अंकिताला किस करताना दिसतोय. काही फोटोंमध्ये अंकिता लोखंडे पती विकी जैनसोबत बेडवर बसून लाजताना दिसत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अंकिता लोखंडे मराठी लूकमध्ये दिसली. तिने काळ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. अंकिता लोखंडेने साडीसोबतचं हलव्याचे दागिनेही परिधान केलं आहेत. हिरव्या बांगड्या, कानातले, नथ आणि अँकलेटमध्ये अंकिता शाही लुकमध्ये दिसत होती.
एकीकडे अंकिता आणि विकीचे हे रोमँटिक फोटो पाहून चाहते आणि सेलिब्रिटी खूश झाले होते, तर दुसरीकडे लोकांनी दोघांनाही ट्रोल करायला सुरुवात केली होती. शो ऑफ केल्याने लोकांनी तिला ट्रोल केलं.