काय सांगता ! जंगी संगीत सेरेमनी नंतर अचानक अंकिता लोखंडेने लग्नाची रिसेप्शन पार्टी केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 05:44 PM2021-12-14T17:44:02+5:302021-12-14T18:12:33+5:30
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकणार आहे.
Ankita Lokhande and Vicky Jain :अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आज बॉयफ्रेन्ड विकी जैनसोबत (Vicky Jain) विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधी काल संगीत सेरेमनी रंगली आणि या सेरेमनीत अंकिता व विकीने धम्माल मज्जा केली. विशेष म्हणजे, बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतही (Kangana Ranaut) या सोहळ्याला हजर होती.कंगनाने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर फोटोदेखील पोस्ट केलेत. अंकिताच्या संगीतपासून ते मेहंदीपर्यंतच्या सेरेमनीत अनेक सेलिब्रेटींना हजेरी लावली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी लग्नापूर्वी रिसेप्शनबाबत एका मोठा निर्णय घेतला आहे. विकी आणि अंकिता लग्नानंतर रिसेप्शन पार्टी रद्द केली आहे. हे कपल आता रिसेप्शन पार्टी देणार नाहीत. कोरोना विषाणूचा हा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन आतापर्यंतच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचे बोलले जात आहे. ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे समजतंय. हा व्हेरिएंट खूप वेगाने पसरत आहे, महाराष्ट्रातही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन अंकिता आणि विकीने रिसेप्शन प्लॅन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता फक्त लग्नालासुद्धा अंकिता आणि विकीचे कुटुंबीय आणि जवळचे मित्रच उपस्थित राहणार आहे. याआधी दोघांनी संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील जवळच्या लोकांना लग्नाचे आमंत्रण दिले होते. त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही लग्नाचे निमंत्रण दिलं होतं.
त्यांच्यासोबतचे काही फोटो त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
विकीचा होणारा पती विकी जैन हा मोठा बिझनेसमॅन आहे. तो गुजराती असला तरीही लग्नाचे सर्व विधी ही महाराष्ट्रीयन परंपरेनुसारच होणार आहे. रॉयल ट्रेडिशनल स्प्लेंडर अशी लग्नाची थीम आहे.