अंकिता लोखंडेनं दिली ‘गुडन्यूज’; आता नवराही करतोय अॅक्टिंग डेब्यू, पाहा प्रोमो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 04:28 PM2022-02-22T16:28:55+5:302022-02-22T16:29:23+5:30
Ankita Lokhande : आत्तापर्यंत तुम्ही अंकिताला पडद्यावर पाहिलं. पण आता अंकिताचा पती विकी जैन हाही स्क्रीनवर झळकणार आहे. होय, विकी लवकरच अॅक्टिंग डेब्यू करतोय.
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ( Ankita Lokhande) हिचे फॅन असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. होय, अंकिताने स्वत: ही गुडन्यूज शेअर केली आहे. आत्तापर्यंत तुम्ही अंकिताला पडद्यावर पाहिलं. पण आता अंकिताचा पती विकी जैन (Vicky Jain) हाही स्क्रीनवर झळकणार आहे. होय, विकी लवकरच अॅक्टिंग डेब्यू करतोय.
‘स्मार्ट जोडी’ (Smart Jodi) नामक स्टार प्लसच्या शोमध्ये अंकितासोबत तिचा पती विकी जैनही झळकणार आहे. अंकिताने एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. शिवाय शोचा प्रोमोही शेअर केला आहे. तू पण अॅक्टिंग करू शकतोस, हे माहित नव्हतं. लाईट, कॅमेरा और अॅक्शन... या जगात तुझं स्वागत आहे बेबी. एकमेकांसोबतचा हा प्रवासही आपण खूप एन्जॉय करू आणि नव्या आठवणी जमा करू, हा विश्वास आहे, असं अंकिताने या पोस्टसोबत लिहिलं आहे.
प्रोमोबद्दल सांगायचं तर यात अंकिता व विकी एकमेकांच्या आवडीनिवडीबद्दल बोलताना दिसत आहेत. आइसक्रिमपासून तर आवडत्या पर्यटनस्थळापर्यत, आवडत्या रोमॅन्टिक सिनेमाबद्दल दोघंही बोलत आहेत. अंकिता अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्यासाठी हा शो करणं फार कठीण नाही. पण विकी मुळात बिझनेसमॅन आहे. त्याचा हा पहिला शो असणार आहे. आता या शोमध्ये तो स्वत:ला कसं सादर करतो, ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे.
अंकिताचा पती विकी हा मोठा बिझनेस मॅन आहे. अगदी प्रत्येक सेक्टरमध्ये त्याचा बिझनेस आहे. विकी हा मुळचा छत्तीसगडचा आहे. अर्थशास्त्र विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने एमबीए केलं आणि यानंतर वडिलोपार्जित व्यवसायात त्याने स्वत:ला झोकून दिलं. विकी एका कोळसा व्यापा-याचा मुलगा आहे. त्याचे आई-वडील विनोद कुमार जैन आणि रंजना जैन दोघेही व्यवसाय करतात. लाकडी कोळसा, पीआयटी कोळसा आणि बिटुमिनस कोळसा असा त्यांचा व्यवसाय आहे.
सध्या विकी हा बिलासपूरमधील महावीर इन्स्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. त्याची ही कंपनी कोल ट्रेडिंग, वॉशरी, लॉजेस्टिक, पॉवरप्लान्ट, रिअल इस्टेट व डायमंडचा व्यवसाय करते. रिपोर्टनुसार, बिलासपूरमध्ये जैन कुटुंबीयांचा फर्निचरचं शोरूमपासून डेंटल इन्स्टिट्यूटपर्यंत अनेक क्षेत्रात मोठा दबदबा आहे. शिक्षण क्षेत्रातही जैन कुटुंबानं मोठा पैसा लावला आहे. विकीचे वडील डेंटल इन्स्टिट्यूटच्या संस्थापकांपैकीएक आहेत. शिवाय एका प्री-स्कूलमध्येही त्यांची गुंतवणूक असल्याचं कळतं. नवीन पिढीतील विकी आता क्रीडा क्षेत्रातही उतरला आहे. तो बॉक्स क्रिकेट लीग संघ, मुंबई टायगर्सचा सहमालक आहे.