"मी बारामतीला गेल्यावर मला..."; अंकिताला सूरज चव्हाणच्या गावी आला विचित्र अनुभव, म्हणाली- "चूक करतो तेव्हा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 09:43 AM2024-11-15T09:43:04+5:302024-11-15T09:47:58+5:30
अंकिता चव्हाणने नुकतीच सूरज चव्हाणची बारामतीला जाऊन भेट घेतल्यावर तिला आलेला अनुभव तिने सांगितलाय (suraj chavan, ankita prabhu walawalkar)
बिग बॉस मराठी ५ मध्ये झळकलेली कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकर नुकतीच सूरज चव्हाणच्या घरी गेली होती. बारामतीला गेल्यावर अंकिताला आलेला विचित्र अनुभव तिने युट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलाय. अंकिता म्हणते की, "सूरजच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला जाते तर मला बाजूला केलं जातं. मला प्रत्येकवेळी टार्गेट केलं जातं." अशाप्रकारे अंकिताने सविस्तरपणे सूरजच्या गावी आलेला तिचा अनुभव शेअर केलाय.
अंकिताने पुढे सांगितलं की, "तुम्ही बिग बॉसनंतर भेटायला लेट का आलात, असं सारखं विचारलं जातं. त्याचा स्वतःहून फोन आला की अंकिताताई सर्व आले तू कधी येणार म्हणून? हे सुद्धा त्याला गावातल्या एका माणसाने बोलायला लावलं. मला वाटलं तो स्वतः बोलतोय. त्याने फोन केला तसं आम्ही गेलो. तुम्ही त्या मुलाचा वापर करुन घेताय हे मला अजिबात पटलं नाहीय. त्यामुळे मी इंन्स्टाग्रामवर पोस्ट टाकलेली की माझ्याकडून अपेक्षा नसाव्यात."
अंकिता पुढे सांगते की, "सूरजला अजितदादा घर बांधून देत आहेत. खूप चांगला प्लॅन आहे. सूरजच्या घरी मी गेले होते. मी जी पोस्ट टाकली त्यात त्याला कोलॅबरेशन दिलं गेलं होतं. नंतर त्याने accept केलं पण नंतर रिमूव्ह केलं गेलं. मला instagram वर अनफॉलो केलं गेलं होतं. नंतर त्यांनी जान्हवीसोबतही collab केलं होतं तेही त्यांनी काढलं म्हणजे सर्व शांत दिसेल. आपण एक चूक करतो तेव्हा आपल्याला हजारवेळा खोटं बोलावं लागतं. यामुळे त्या मुलाचा नाहक बळी जाऊन देऊ नका."
अंकिता पुढे म्हणाली की, "सूरज बिग बॉसच्या घरात होता तसा तो बाहेर आल्यावर नाही. सूरज गणपतीच्या मातीसारखा आहे. त्याला जसा आकार द्याल तसा तो करतो. सूरज स्वतःचं मत नाही मांडत. त्याच्या आजूबाजूचे लोकं त्याला चुकीच्या पद्धतीने गाईड करत आहेत. आम्ही त्याला १ तास आधीच सांगितलं होतं की आम्ही तासाभरात पोहोचतोय. पण सूरज अंघोळीला गेला होता. सूरज आल्यावर मला सांगितलं की, उठा उठा उभे राहा. हे काय? हे काय.. हा सूरज नाहीये."
अंकिता पुढे म्हणाली की, "मी सूरजवर जेवढं होईल तेवढं लक्ष देईल. पण मला आता या दलदलीमध्ये पडायचं नाहीय. सूरजसारख्या मुलाला मिसगाईड करु नका. त्याने जे केलंय ते त्याला टिकवूदे. त्याच्या जीवावर इतर लोक मोठे आहेत. अजितदादा सूरजला घर बांधून देत आहेत ते खूप सुंदर आहे. सूरज खाताना जेवण सांडतो. तो लहान नाहीये म्हणून बिग बॉसच्या घरात त्याला माझी सांगण्याची पद्धत वेगळी होती. हे मॅनर असतात. आम्हालाही कोणी शिकवलं नाही. याच कारणास्तव मी त्याला शिकवले आहेत. पण आता हे खूप चिघळत चाललंय."
अंकिता पुढे सांगितलं की, "त्यामुळे आता माझ्याकडून अपेक्षा ठेऊ नका. सूरजसाठी जेवढं करायचं तेवढं मी करतेय पण तिकडून रिस्पॉन्स तेवढा येत नाहीय. त्यामुळे आता या गोष्टीपासून मला बाहेर पडणं योग्य वाटतंय. मला आता आजूबाजूला निगेटिव्हीटी नकोय. हे सगळं झाल्यावर सूरजने मला कॉल केला होता. (मग अंकिताने व्हिडीओ क्लीप दाखवली) या सगळ्यातनं मी माझा काढता पाय घेते. शेवटी एवढंच सांगते की, सूरज हा अतिशय भोळा आहे. तुम्ही सूरजला इव्हेंटला बोलवत असाल तर जे पैसे तुम्ही सूरजला देत आहात तर तै पैसे सूरजच्या अकाऊंटला जात असतील, त्या पैशांचा उपयोग सूरजसाठीच होतोय का याची शहानिशा करा."
अंकिता शेवटी म्हणाली की, "सूरज ज्या पद्धतीने वागणं होतं की वाट बघायला लावणं.. त्यानंतर मी सतत विचारत होते नक्की तुम्ही सूरजला कळवलंय का? कारण मी एवढ्या लांबून आलेय तर तो लगेच यावा एवढीच माझी अपेक्षा होती. ठीकेय, तो कामात होता म्हणून आला नाही. पण तो आल्यावर मी त्याला हाक मारली तर त्याने दुर्लक्ष केलं. प्लीज त्याच्यावर राग ठेऊ नका. त्याच्या गावी गेले होते तेव्हा दिवसभरात त्याच्या हातात फोन नव्हता. त्याचा मोबाईल दुसऱ्याच कोणाच्या हातात असतो. तिसराच त्याच्या मोबाईलवर व्हिडीओ एडिट करत असतो. काहीही सुरु आहे. याची त्याला कल्पना नसावी."