अंकिता प्रभू वालावलकरचं आडनाव इतकं मोठं कसं? 'कोकण हार्टेड गर्ल' खुलासा करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 03:55 PM2024-08-24T15:55:54+5:302024-08-24T15:58:17+5:30

कोकण हार्टेड गर्लने सांगितला प्रभू वालावलकर या मोठ्या आडनावामागचं रहस्य. (bigg boss marathi 5)

Ankita Prabhu walawalkar last name so long Konkan Hearted Girl made a special disclosure | अंकिता प्रभू वालावलकरचं आडनाव इतकं मोठं कसं? 'कोकण हार्टेड गर्ल' खुलासा करत म्हणाली...

अंकिता प्रभू वालावलकरचं आडनाव इतकं मोठं कसं? 'कोकण हार्टेड गर्ल' खुलासा करत म्हणाली...

बिग बॉस मराठीच्या घरात चौथा आठवडा सुरु आहे. आज बिग बॉसच्या घरात चौथ्या आठवड्यातील भाऊचा धक्का पार पडणार आहे. रितेश देशमुख पुन्हा एकदा सदस्यांची चांगलीच शाळा घेणार आहे. बिग बॉसच्या घरात या सीझनमध्ये एकापेक्षा एक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यातील सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे अंकिता प्रभू वालावलकरची. 'कोकण हार्टेड गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेली अंकिता वालावलकर बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये चांगला खेळ दाखवतेय. अंकिताने बिग बॉसच्या घरात तिचं आडनाव मोठं का आहे? हे सांगितलंय. 

म्हणून अंकिताचं आडनाव मोठं आहे

अंकिता प्रभू वालावलकर बिग बॉसच्या घरात गार्डन एरियात बसली होती. आर्या, DP, सूरज आणि अभिजीत हे चौघेजण तिच्यासोबत बसले होते. त्यावेळी अंकिताने हा किस्सा सांगितला. DP ला वाटलं अंकिता प्रभू वालावलकरमधील 'प्रभू' हे तिच्या वडिलांचं नाव आहे. अंकिताच्या वडिलांचं नाव प्रमोद आहे. कोकणात अनेकांना 'सामंत' किंवा 'प्रभू' ही पदवी दिली जाते. अंकिताच्या कागदपत्रांवर तिचं नाव अंकिता वालावलकर इतकंच आहे. परंतु अंकिताला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तिने नावापुढे प्रभू लावायला सुरुवात केली.


अंकिताच्या खेळाची चांगलीच चर्चा

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये अंकिताच्या खेळाची चांगलीच चर्चा आहे. अंकिता तिच्या संभाषणचातुर्याच्या जोरावर घरातल्या सर्व सदस्यांसोबत मिळून मिसळून  वागताना दिसते. इतकंच नव्हे तर पहिल्या आठवड्यात टास्कमध्ये चांगली कामगिरी करुन अंकिताने बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची पहिली कॅप्टन होण्याचा बहुमान मिळवला. अंकिताची घरातील DP, आर्या, वर्षा उसगांवकर आणि सूरज चव्हाणसोबत चांगली मैत्री असलेली दिसते.

 

Web Title: Ankita Prabhu walawalkar last name so long Konkan Hearted Girl made a special disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.