लग्नाला होकार देण्याआधी अंकिताने बॉयफ्रेंडसमोर गणेशोत्सवाबद्दल ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "माझ्या आईने त्याला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:40 PM2024-08-23T14:40:46+5:302024-08-23T14:41:13+5:30
अंकिताने बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार देताना त्याच्यासमोर गणेश चतुर्थीबद्दल ही अट ठेवली होती (ankita walawalkar, bigg boss marathi 5)
अंकिता प्रभू वालावलकर ही बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये सहभागी आहे. अंकिता तिच्या खेळाने, हुशारीने बिग बॉस मराठीचं घर गाजवतेय. स्पष्टवक्तेपणा आणि समंजसपणा हे अंकिताचे गुण बिग बॉस मराठीच्या घरात दिसत आहेत. अंकिताने चांगल्या खेळाच्या जोरावर बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनचा पहिला कॅप्टन होण्याचा बहुमानही मिळवला. बिग बॉस मराठीच्या घरात योगिता चव्हाणशी बोलताना अंकिताने एक खास किस्सा सांगितला. होणाऱ्या नवऱ्याला लग्नासाठी होकार देताना अंकिताने त्याच्यासमोर गणेश चतुर्थीविषयी काय अट ठेवली होती, याचा खुलासा तिने केलाय.
अंकिताच्या बॉयफ्रेंडसमोर ठेवली ही अट
अंकिताच्या घरी खूप आधीपासून गणपती आहे. अंकिता जेव्हा लहान होती तेव्हा घरात मुलगा नसल्याने तिच्या आई-बाबा आणि आजीला गणपतीचं पुढे कोण करणार, याची काळजी होती. त्यावेळी घरच्या गणपतीचं मीच सर्व करेल असं अंकिताने ठरवलं होतं. पुढे मोठं झाल्यावर तिला कळलं की, तिचं लग्न झाल्यावर ती दुसऱ्या घरी जाईल. नवऱ्याच्या घरीही गणपती असेल असा विचार तिने केला. त्यामुळे अंकिताने जेव्हा बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार दिला त्याआधी तिने गणपतीविषयी चौकशी केली. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी ७ दिवसांचा गणपती असतो. अंकिताच्या घरीही ७ दिवसांचा गणपती असतो. त्यामुळे तिच्या होणाऱ्या नवऱ्याने अंकिताला सुचवलं की तिच्या घरचा गणपती ९ दिवसांचा करावा. म्हणजे शेवटच्या दोन दिवशी नवऱ्यासोबत अंकिता तिच्या घरी जाऊ शकेल.
अंकिताने शोधला हा उपाय
बॉयफ्रेंडने ९ दिवसांचा गणपती ठेवण्याचा सल्ला, अंकिताला मान्य नव्हता . कारण पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अंकितालाच सर्व करावं लागत होतं. त्यामुळे त्याने अंकिताच्या म्हणण्याचा मान राखला. अंकिताला घरच्या गणपतीकडे लक्ष देणं गरजेचं होतं. अंकिताच्या आईनेही लग्नाची बोलणी करायच्या अंकिताच्या भावी नवऱ्याला गणपतीविषयी विचारलं होतं. तेव्हा अंकिताने आईला शब्द दिला की, ती असेपर्यंत त्यांच्या घरच्या गणपतीचं सर्व तिच बघेल. त्यामुळे जेव्हा लग्न होईल तेव्हा अंकिता त्यांच्या गणपतीची पूर्वतयारी करुन पहिले दोन दिवस नवऱ्याकडच्या गणपतीचा उत्सव साजरा करेल. नंतर तिसऱ्या-चौथ्या दिवशी ती तिच्या घरातील गणपतीकडे लक्ष देईल.