अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 08:58 AM2024-11-04T08:58:42+5:302024-11-04T08:59:36+5:30
अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांनीही भाऊबीज आनंदात साजरी केली.
Bhaubeej : भाऊबीज हा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा पवित्र सण. यादिवशी या दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. सेलिब्रिटीही हा सण उत्साहात साजरा करतात. 'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांनीही भाऊबीज आनंदात साजरी केली. विशेष म्हणजे त्यांनीही ही भाऊबीज काही दिवासंपुर्वीच साजरी केली होती. याचा व्हिडीओ अंकिताने भाऊबीज या दिवशी शेअर केलाय.
नुकतंच अंकिता होणाऱ्या नवऱ्यासह कोल्हापूरला पोहचली होती आणि धनंयजला सरप्राईज दिलं होतं. तेव्हाच तिने धनंजयला ओवाळले आणि एक हटके गिफ्ट दिलं. भाऊबीजनिमित्ताने अंकिताने तो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये अंकिता समुद्र किनारी धनंजयसाठी खास गिफ्ट घेताना दिसतेय. अंकिता म्हणते, "डीपी दादा बायकोला फक्त कोकणात फिरवायला घेऊन जातात आणि वहिनी मला सांगतात, अगं मला मासे आवडता". म्हणून त्यांच्यासाठी युनिट गिफ्ट घेऊन भाऊबीजेला भेटायला आले. अंकिताने दिलेले हे गिफ्ट म्हणजे कोकणातले मासे आहेत.
अंकिताने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलं, "वेळ नाही सांगून सतत बायकोला फक्त कोकण फिरवणाऱ्या माझ्या भावाला भाऊबीजेच्या निमित्ताने एकच विनंती की वहिनीला काश्मिर फिरायला घेऊन जा". अंकिता आणि धनंजय पोवार यांची मैत्री ‘बिग बॉस’च्या आधीपासूनची आहे. मात्र, घरात प्रवेश घेतल्यावर या दोघांचं भावा-बहिणीचं नातं अजून घट्ट झालं. पहिल्या दिवसापासून अंकिताचे डीपी दादा तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते. खेळात या दोघांनी एकमेकांना खूप चांगली साथ दिली. अंकिता-डीपीमध्ये अनेकदा खटके देखील उडाले पण, या भांडणांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट या भावा-बहिणीचं नातं आणखी घट्ट झालं. आता बिग बॉसच्या घराबाहेरही ते नाते जपताना दिसून येत आहेत.