अंकिता-कुणालची कधी अन् कुठे झाली पहिली भेट? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 11:17 IST2025-01-28T11:16:53+5:302025-01-28T11:17:05+5:30
अंकिता वालावलकरनं सांगितली हटके लव्हस्टोरी, म्हणाली...

अंकिता-कुणालची कधी अन् कुठे झाली पहिली भेट? फिल्मी अन् तेवढीच हटके लव्हस्टोरी
Ankita Walavalkar And Kunal Bhagat Lovestory: 'कोकण हार्टेड गर्ल' (Kokan Hearted Girl) अशी ओळख असणारी 'बिग बॉस' फेम अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत (Kunal Bhagat) याच्यासोबत ती नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची तयारी जोरदार सुरू आहे. या दोघांच्या प्रेमाची गोष्ट खूप खास आहे. जाणून घ्या कशी झाली दोघांची पहिली ओळख.
नुकतंच अंकिता आणि कुणाल हे 'लक्ष्मी निवास' मालिकेच्या सेटवर उपस्थिती लावली होती. यातच सेटवरील एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात अंकिता, कुणाल आणि 'लक्ष्मी निवास' मालिकेत लक्ष्मी हे पात्र साकारत असलेल्या हर्षदा खानविलकर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हर्षदा खानविलकरांना अंकितानं आपल्या लग्नाची पत्रिका दिली. यावेळी हर्षदा खानविलकर कुणालला म्हणतात, "तुझाच सेट आहे हा… तुच म्युझिक करतोय आता सूनबाईंना लवकर घेऊन ये हा बाबा".
यावर अंकिता सांगते, "आमचं जमलंही झी मराठीमुळेच… मी एक रेड कार्पेट इव्हेंट होस्ट करत होते. तेव्हाच आमची भेट झाली होती. कुणालला एका मालिकेसाठी अवॉर्ड मिळाला होता आणि त्याचवेळी मी होस्ट करत होते. आमची ओळख आधीच होती. पण, आम्ही एकमेकांना भेटलो नव्हतो. तिथे आमची भेट झाली. त्यामुळेच आम्ही म्हणतो झी मराठीनेच जमवलंय".
'लक्ष्मी निवास' मालिकेचं संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी कुणालकडे आहे. झी टिव्हीवरील 'लक्ष्मी निवास' आणि 'पारू' या मालिकांचा हा महासंगम आहे. 'पारू' मालिकेत अहिल्यादेवी व कुटुंबीयांकडून अनुष्का व आदित्यचा साखरपुडा आयोजित करण्यात आला आहे. तर, 'लक्ष्मी निवास' मालिकेत जयंत आणि जान्हवीचा विवाहसोहळा पार पडणार आहे. याच्या प्रमोशनसाठी झीटीव्हीनं अंकिताला बोलावलं होतं. याचा एक अधिकृत व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्यामध्ये 'लक्ष्मी निवास' मालिकेत लक्ष्मी ही अंकिताला लग्नाचं आमंत्रण देते. तर यावेळी अंकिताही लक्ष्मी तिच्या आणि कुणालच्या लग्नाची पत्रिका देते.