आयुष्याचा जोडीदार म्हणून 'कुणाल भगत'ला का निवडलं? नेटकऱ्याच्या प्रश्नाला अंकितानं दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 05:54 PM2024-12-04T17:54:44+5:302024-12-04T17:55:49+5:30
आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाल भगत हा का योग्य वाटला, याचा खुलासा खुद्द अंकितानेच केला आहे.
'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अंकिताचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या बद्दल प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते कायम उत्सुक असतात. अंकिता लवकर लग्नबंधनात अडकणार आहे. संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्यासोबत ती नव्या आयुष्याची सुरूवात करणार आहे. आयुष्याचा जोडीदार म्हणून कुणाल भगत हा का योग्य वाटला, याचा खुलासा खुद्द अंकितानेच केला आहे.
अंकिताच्या आयुष्यात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते हे उत्सुक असतात. अंकितादेखील सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर 'Ask me a Question' हे सेशन ठेवलं होतं. यावेळी तिनं चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी चाहत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी एका चाहत्याने तिला 'तुझी आणि कुणाल दादाची जोडी खूपच गोड आहे.. कोणत्या एका गोष्टीमुळे वाटलं की हाच मुलगा आपल्यासाठी योग्य ?' असा प्रश्न केला. यावेळी तिनं या प्रश्नाला दिलेल्या उत्तराने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतलं.
अंकिता उत्तरात म्हणाली, "अनेक कारणं आहेत... माझ्यातील मीच हरवले होते. पण, त्यानं पुन्हा माझी माझ्याशीच भेट घडवली. मला शोधण्यात मदत केली, एखाद्या उघड्या पुस्तकासारखं तो मला वाचतो. त्याला माझी शांतता ऐकू येते. माझी निष्ठा, माझे हेतू, माझे परिश्रम आणि माझ्या ध्येयाबाबत तो कधीही शंका घेत नाही. जेव्हा मी पुर्णपणे गोंधळेली असते, तेव्हा तो गुंता सोडवण्यात तो मदत करतो".
अंकिता व कुणाल येत्या फेब्रुवारी महिन्यात सिंधुदुर्गात (Sindhudurg) लग्न करणार आहेत. अंकिता व कुणालने ‘आनंदवारी’ (Anandwari) या गाण्यात एकत्र काम केले होते. अंकिताचा होणारा नवरा कुणालचं गाव अलिबाग आहे. कुणालने आतापर्यंत अनेक मालिका व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन (Music Direction) केले आहे. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.