'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 11:03 AM2024-08-02T11:03:27+5:302024-08-02T11:03:41+5:30

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा रडलीय. यावेळी कारण भांडी घासण्याचं आहे. काय म्हणाली बघा (bigg boss marathi 5)

Ankita walawalkar break down tears she said trauma of washing utensils video viral | 'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली

'बिग बॉस'च्या घरात अंकिताचा ड्रामा, म्हणते मला भांडी घासायचा आहे Trauma, कोकण हार्टेड गर्ल रडली

बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असलेली अंकिता वालावलकरची सध्या चांगलीच चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी अंकिता आणि निक्कीचं घरात चांगलंच भांडण झालं. त्यावेळीही निक्कीला वैतागून अंकिता रडलेली पाहायला मिळाली. आता बिग बॉसच्या आजच्या भागाचा नवीन प्रोमो भेटीला आलाय. या प्रोमोत अंकिता पुन्हा रडताना बघायला मिळतेय. भांडी घासायला दिली म्हणून अंकिता ढसाढसा रडताना दिसली. 

अंकिताच्या डोळ्यात पुन्हा पाणी, कारण...

अंकिता वालावलकर, आर्या जाधव आणि पुरुषोत्तमदादा सोफ्यावर बसले होते. तेव्हा अंकिताच्या डोळ्यातून पाणी आलं. ती आर्याला म्हणाली, "मला भांडी घासायचा trauma आहे." अंकिताची भावुक अवस्था बघून आर्या भांडी घासायची तयारी दाखवते. पुढे अंकिता रडत रडतच आर्याला म्हणते, "मला trauma असूनही मी भांडी घासतेय. तू नको घासू भांडी. मला घासायची आहेत, कारण मला माझ्या वीक पॉईंट्सवर मात करायचीय. माझ्या घरच्यांनाही माहितीय की मी नाही घासत भांडी."


भांडणं झाली की लांब जायचं: अंकिता

अंकिता आर्याला पुढे म्हणाली, "तुला मी चांगल्यासाठी सांगते की जिथे आपल्याला भांडणं दिसतात तिथून आपण लांब जायचं. भांडण नाही करायचं असं म्हणतेय. तू ट्राय कर. तुझं वय आता ते आहे. तू बुद्धीने भांडतेस, आपल्या हक्कांसाठी आपण भांडलंच पाहिजे. चांगली गोष्ट आहे. पण समोरचा व्यक्ती तापट होताना दिसतोय ना तर आपण शांत राहायचं. त्यामुळे शांती ठेवायची." अशाप्रकारे अंकिता आर्याला समजावताना दिसली. 

Web Title: Ankita walawalkar break down tears she said trauma of washing utensils video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.