'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरची मोठी उडी; स्वत:च्या कमाईने घेतली आलिशान 'ऑडी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:09 IST2025-01-11T09:08:58+5:302025-01-11T09:09:35+5:30
बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकरने स्वतःची मेहनत आणि कष्टाच्या जोरावर आलिशान गाडी खरेदी केलीय (ankita walawalkar)

'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरची मोठी उडी; स्वत:च्या कमाईने घेतली आलिशान 'ऑडी'
बिग बॉस मराठी फेम कोकण हार्टेड गर्ल अशी ओळख असलेल्या अंकिता वालावलकरने शानदार गाडी घातलीय. अंकिताने गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना ही आनंदाची बातमी दिलीय. गाडी घेताना अंकितासोबत तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतही सोबत होता. याशिवाय अंकिताच्या बहिणी आणि कुटुंबही सोबत होतं. बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन गाजवल्यानंतर अंकिताने स्वतःच्या कष्टावर ही गाडी घातलीय.
अंकिताने गाडीचं ठेवलं खास नाव
अंकिताने शोरुममधील गाडी घेतानाचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. आवडी आली असं खास कॅप्शन देत अंकिताने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली. अंकिताने शानदार ऑडी कार खरेदी केलीय. स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर गाडी घेतलेल्या अंकिताचं तिचे चाहते आणि मित्रमंडळी अभिनंदन करत आहेत. अंकिताने 'आवडी' असं गाडीचं खास नावही ठेवलेलं दिसतंय. शोरुममध्ये केक कापून अंकिताने या आनंदी बातमीचं सेलिब्रेशन केलं.
अंकिता लवकरच करणार लग्न
काहीच दिवसांपूर्वी अंकिता वालावलकरने तिच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर केली होती. केळीच्या हिरव्या पानाचं डिझाईन असलेली ही पत्रिका लोकांच्या पसंतीस उतरली. पहिली पत्रिका कुलदेवतेला आणि आजोळच्या देवीला #कोकणी परंपरा असं कॅप्शन देऊन अंकिताने लग्नाची पत्रिका शेअर केली होती. अंकिता तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत पुढील महिन्यात अर्थात फेब्रुवारीमध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे.