"जेव्हा बहीण कपडे खरेदी करते..." धनंजय आणि अंकिताचा मजेशीर Video पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:52 IST2025-01-03T14:50:48+5:302025-01-03T14:52:48+5:30
धनंजय आणि अंकिताचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

"जेव्हा बहीण कपडे खरेदी करते..." धनंजय आणि अंकिताचा मजेशीर Video पाहिलात का?
Ankita Walawalkar - Dhananjay Powar : 'बिग बॉस मराठी' सीजन 5 चं (Bigg Boss Marathi Season 5) पर्व खूप गाजलं. या सिजनमधील एक चर्चेत राहिलेली भावाबहिणीची जोडी म्हणजे अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आणि धनंजय पोवार (Dhananjay Powar). पहिल्या दिवसापासून अंकिताचे डीपी दादा तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले होते. खेळात या दोघांनी एकमेकांना खूप चांगली साथ दिली. अंकिता-डीपीमध्ये अनेकदा खटके देखील उडाले पण, या भांडणांचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काहीच परिणाम झाला नाही. उलट या भावा-बहिणीचं नातं आणखी घट्ट झालं. आता 'बिग बॉस'च्या घराबाहेरही ते नाते जपताना दिसून येत आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
मानलेल्या भावाबहिणीची ही जोडी 'बिग बॉस'नंतरही एकमेकांच्या संपर्कात आहेत. धनंजय पोवार आणि अंकिता यांची नुकतंच भेट झाली. दोघे एकत्र शॉपिगवर गेले होते. "जेव्हा आपली बहीण कपडे खरेदी करत असते", असं कॅप्शन देत धनंजयने एक मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात अंकिता कपडे खरेदी करताना दिसतेय. तर धनंजय हा थकलेल्या अवस्थेत जमिनीवर बसलेला दिसतोय. व्हिडीओसोबतच त्यानं लिहलं, "कपडे खरेदी करायला ११ वाजले पासून रात्री ११ वाजले आम्हाला तरी सोडत नव्हती".
धनंजय आणि अंकिताचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला आहे. या आधीही धनंजय यांनी अंकितासोबतचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. जे व्हिडीओ चाहत्यांना खूप पसंत पडले होते. धनंजय आणि अंकिता हे दोघेही सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात.
अंकिता वालावलकर ही आता फेब्रुवारी महिन्यात लग्न बंधनात अडकणार आहे. ती संगीत दिग्दर्शक कुणाल भगत याच्याशी लवकरच लग्न करणार आहे. त्यांचं लग्न कोकणात होणार असून नंतर मुंबईमध्ये रिसेप्शन पार पडणार असल्याचं म्हटलं जातंय. अंकिताच्या लग्नातही एक भाऊ म्हणून जे काही करता येईल, ते करणार, असे धनंजयने म्हटलं आहे.