'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; ती म्हणाली,"मला नात्यांची भीती वाटते"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 05:41 PM2024-08-19T17:41:48+5:302024-08-19T17:44:07+5:30

Ankita Walawalkar : बिग बॉसच्या घरात 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचे डोळे पुन्हा पाणावलेले पाहायला मिळणार आहेत.

Ankita's eyes water again in 'Bigg Boss Marathi' house; She said, "I'm afraid of relationships." | 'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; ती म्हणाली,"मला नात्यांची भीती वाटते"

'बिग बॉस मराठी'च्या घरात अंकिताचे डोळे पुन्हा पाणावले; ती म्हणाली,"मला नात्यांची भीती वाटते"

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi 5)चा चौथा आठवडा आता सुरू झाला आहे. गेले तीन आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे. आता चौथ्या आठवड्यातही सदस्य धमाका करताना दिसणार आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून सदस्य आपल्या घरापासून दूर आहेत. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरात ते नाती बनवताना दिसत आहेत. आजच्या भागात 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकरचे डोळे पुन्हा पाणावलेले पाहायला मिळणार आहेत.

'बिग बॉस मराठी'च्या घरातील टीम B मधील सदस्य आज एकमेकांना समजावताना दिसणार आहेत. दरम्यान डीपी दादा अंकिताला प्रेमाने भेळ भरवतो. दरम्यान अंकिता म्हणते,"मला नात्यांची भीती वाटते... नॉमिनेट करण्याचा टास्क दिला तर". यावर डीपी दादा म्हणतो,"कर मला नॉमिनेट". तर पॅडी दादा म्हणतो,"जास्त नाती लावू नका..त्रास होतो नंतर". पुढे डीपी दादा अंकिताला समजावतो. 

निक्की अन् वर्षा ताईंची नोकझोक पाहिलीत का?
निक्की आणि वर्षा ताईंची नोकझोक आजच्या भागात पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. निक्की वर्षा ताईंनी म्हणत आहे,"पुढे बघायचं असतं माझ्या चेहऱ्यावर नाही". त्यावर वर्षा ताई जान्हवीकडे पाहत म्हणतात,"एवढं सौंदर्य असताना मी दुसरीकडे का पाहू". जान्हवीच्या बटांवर हात फिरवत वर्षाताई म्हणतात,"किती सुंदर या बटा". वर्षा ताई पुढे म्हणतात,"बिग बॉस रागवतील माझ्यावर... कारण निरर्थक बडबड करण्याची मला सवय नाही". 

Web Title: Ankita's eyes water again in 'Bigg Boss Marathi' house; She said, "I'm afraid of relationships."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.