​आक्षका गोराडियाने केला अमेरिकन प्रियकरासोबत साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 01:01 PM2016-12-28T13:01:44+5:302016-12-28T13:01:44+5:30

नागिन फेम आक्षका गोराडियाने तिचा अमेरिकन प्रियकर ब्रेंट गोबलसोबत नुकताच साखरपुडा केला. आक्षका आणि ब्रेंट काही दिवसांपूर्वी ख्रिसमस साजरा ...

Ankka Goradia made a deal with the American lover | ​आक्षका गोराडियाने केला अमेरिकन प्रियकरासोबत साखरपुडा

​आक्षका गोराडियाने केला अमेरिकन प्रियकरासोबत साखरपुडा

googlenewsNext
गिन फेम आक्षका गोराडियाने तिचा अमेरिकन प्रियकर ब्रेंट गोबलसोबत नुकताच साखरपुडा केला. आक्षका आणि ब्रेंट काही दिवसांपूर्वी ख्रिसमस साजरा करण्यासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरू असतानाच ब्रेटने आक्षकाला लग्नाची मागणी घातली. गुडघ्यांवर बसून ब्रेंटने त्याच्या घरातल्यांसमोर आक्षकाला लग्नासाठी विचारले. हा क्षण आक्षकासाठी अतिशय महत्त्वाचा होता असे ती सांगते. ब्रेंटने आक्षकाला घातलेली अंगठी ही डायमंडची असून ती अतिशय महागाची असल्याची चर्चा आहे. 
आक्षकाला प्रपोज करण्यासाठी ब्रेंटने कित्येक दिवसांपूर्वीच या दिवसाची निवड केली होती आणि प्रपोज कसे करायचे याचे सगळे प्लानिंगदेखील त्याने केले होते. आक्षकाला मिळालेल्या या सरप्राईजमुळे ती सध्या खूपच खूश आहे. आक्षका सांगते, "ब्रेंटमुळे मला खऱ्या प्रेमाची जाणीव झाली आहे. त्याच्यासोबत माझे संपूर्ण आयुष्य घालवण्याचा मी निर्णय घेतला आहे. ब्रेंट मला आयुष्याभर आनंदात ठेवेन याचा मला संपूर्ण विश्वास आहे." 
आक्षका आणि ब्रेंट यांनी अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख ठरवलेली नाही. त्यांच्या साखरपुड्याप्रमाणेच ते लग्नही अचानकच करतील अशी सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. 
आक्षका आणि ब्रेंटची भेट जूनमध्ये अमेरिकेत एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली होती. दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. ब्रेंट हा एक व्यवसायिक असून अमेरिकन आहे. पण आक्षकासाठी तो सप्टेंबरपासून भारतातच राहात आहे.
आक्षका ब्रेंटच्या प्रेमात पडण्यापूर्वी अभिनेता रोहित बक्षीसोबत तिचे 10 वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण काहीच महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले. 

Web Title: Ankka Goradia made a deal with the American lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.