अंकुश चौधरीची पत्नी दिपाचं कलाविश्वात पुनरागमन, त्यावर अभिनेता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 11:03 AM2022-08-13T11:03:50+5:302022-08-13T11:04:26+5:30
Deepa Parab-Chaudhari: दीपा बऱ्याच वर्षांनंतर ‘तू चाल पुढं’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे.
झी मराठीवर सध्या अनेक नव्या मालिका भेटीला येत आहेत. या नव्या मालिकेतील एका मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे कमबॅक होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे दीपा परब-चौधरी (Deepa Parab Chaudhari). दीपा एक प्रसिद्ध अभिनेत्री असून ती अंकुश चौधरी(Ankush Chaudhari)ची पत्नी आहे. दीपा बऱ्याच वर्षांनंतर ‘तू चाल पुढं’ (Tu Chaal Pudha)मालिकेतून छोट्या पडद्यावर दिसणार आहे. तिच्या कमबॅकवर अंकुश चौधरीची नेमकी प्रतिक्रिया काय होती हे जाणून घ्यायला चाहते उत्सुक आहेत. दीपा परब हे नाव इंडस्ट्रीसाठी तसे नवीन नाही. दीपा यांच्या कमबॅकने चाहते जसे खुश झालेत तशीच काहीशी प्रतिक्रिया अंकुशने सुद्धा दिल्याचे खुद्द दीपाने एका मुलाखतीत सांगितले.
दीपाला अंकुशने नेमकी काय प्रतिक्रिया दिली याबद्दल विचारणा झाली. तेव्हा तिने सांगितले की, अंकुशला जेव्हा तू चाल पुढं हे कथानक कळलं, स्टोरी काय आहे हे समजलं त्याला ते फारच आवडले. त्याने मला तू हे नक्कीच करायला हवे असे सांगितले. तुझ्याकडे ही भूमिका करून दाखवायची क्षमता आहे तर ती वाया घालवू नकोस असे सुद्धा त्याने मला आवर्जून सांगितले. तसेच माझ्या मुलाला सुद्धा गोष्ट फार आवडली.
ती पुढे म्हणाली की, असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषमागे एक स्त्री असते पण यशस्वी स्त्रीमागे संपूर्ण कुटुंब असते. मलाही असाच सपोर्ट माझ्या कुटुंबीयांनी केला. माझा मुलगा मोठा होत असताना त्याच्याजवळ राहून मी लक्ष देत होते. पण आता त्याची, घराची जबाबदारी सांभाळत मी पुन्हा कामाकडे लक्ष द्यायचे ठरवले आहे. आहेत त्या जबाबदाऱ्या सांभाळत मी शूटिंग सुद्धा करते आहे.
तू चाल पुढं मालिकेतील दीपा परबची भूमिका सगळ्या गृहिणींना जवळची वाटेल अशीच आहे. एखादी गृहिणी संसारासोबत स्वतःची स्वप्ने सुद्धा पूर्ण करू शकते, अशा कथानकावर आधारित ही मालिका १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या मालिकेचे सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. या मालिकेत वहिनीसाहेब उर्फ धनश्री काडगावकर पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे.