अण्णा आणि शेवंताचे फॅन असाल तर नक्कीच वाचा ही बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 17:19 IST2021-02-18T17:18:48+5:302021-02-18T17:19:49+5:30

रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार याची घोषणा झाल्यापासून या मालिकेत कोण कोण कलाकार असणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

anna shevanta chemistry will blossom in ratris khel chale 3 | अण्णा आणि शेवंताचे फॅन असाल तर नक्कीच वाचा ही बातमी

अण्णा आणि शेवंताचे फॅन असाल तर नक्कीच वाचा ही बातमी

ठळक मुद्देरात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे.

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून काही वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले २' प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यात आला होता.

रात्रीस खेळ चाले २ या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडली होती. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. पण त्याचसोबत या मालिकेतील अण्णा, माई आणि शेवंता हे तर प्रेक्षकांचे जीव की प्राण झाले होते. या मालिकेमुळे त्यांना चांगलेच फॅन फॉलॉव्हिंग मिळाले. पण ही मालिका संपल्यानंतर प्रेक्षक या मालिकेला मिस करायला लागले आहेत. मात्र या मालिकेच्या फॅन्ससाठी खुशखबर आहे. आता रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अण्णा परत येतायेत... असा प्रोमो सध्या आपल्याला झी मराठीवर पाहायला मिळत आहे. अण्णासोबतच प्रेक्षकांनी लाडकी शेवंतादेखील या मालिकेत पाहायला मिळणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. 

रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. 

Web Title: anna shevanta chemistry will blossom in ratris khel chale 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.