मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं अडकणार लग्नबेडीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 18:42 IST2024-04-20T18:42:06+5:302024-04-20T18:42:37+5:30
सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक जोडपे लग्नबेडीत अडकणार आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक जोडपं अडकणार लग्नबेडीत
सध्या मराठी सिनेइंडस्ट्रीत लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच तितिक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके यांनी लग्न केले. त्यानंतर आता आणखी एक जोडपे लग्नबेडीत अडकणार आहेत. हे जोडपे म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा, अभिनेता शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote) आणि अभिनेत्री अमृता बने (Amruta Bane). शुभंकर आणि अश्विनी यांचा विवाह उद्या म्हणजेच २१ एप्रिल, २०२४ ला पुण्यात पार पडणार आहे.
शुभंकर एकबोटे आणि अमृता बने उद्या सात फेरे घेणार आहे. आज त्यांचे पुण्यात संगीत सेरेमनी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडणार आहे. सोशल मीडियावर त्याची झलक पाहायला मिळत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शुभंकर आणि अमृताचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता. साखरपुड्याच्या चार महिन्यानंतर ६ एप्रिलला व्याही भोजनाचा कार्यक्रम झाला. दोघांच्या कुटुंब व जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा व्याही भोजनाचा कार्यक्रम पार पडला.
त्यानंतर १८ एप्रिलला शुभंकरच्या घरी मेहंदी समारंभ झाला. यावेळी अभिनेत्याने दोन्ही हातावर मेहंदी काढली. तसेच अमृताच्या मेहंदी समांरभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
शुभंकर व अमृता यांची जोडी कन्यादान मालिकेमुळे जमली. या मालिकेत दोघे ऑनस्क्रीन पती पत्नीचे काम करत आहेत आणि आता खऱ्या आयुष्यातही नवरा-बायको होणार आहेत. आता त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.