'सा रे ग म प'च्या या स्पर्धकांमध्ये अनु मलिक यांना दिसली आशाजी आणि लताजींची झलक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 07:50 PM2023-09-07T19:50:34+5:302023-09-07T19:50:45+5:30

Sa Re Ga Ma Pa Show : 'सा रे ग म प'च्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे

Anu Malik caught a glimpse of Ashaji and Lataji in the contestants of 'Sa Re Ga Mp'! | 'सा रे ग म प'च्या या स्पर्धकांमध्ये अनु मलिक यांना दिसली आशाजी आणि लताजींची झलक!

'सा रे ग म प'च्या या स्पर्धकांमध्ये अनु मलिक यांना दिसली आशाजी आणि लताजींची झलक!

googlenewsNext

'सा रे ग म प'च्या नवीन पर्वाला नुकतीच सुरुवात झाली असून या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात हिमेश रेशमिया, नीति मोहन आणि अन्नू मलिक हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य नारायण करत आहे. यंदाच्या सीझनमधील दोन स्पर्धक निष्ठा शर्मा आणि रोनिता बॅनर्जी यांनी अप्रतिमपणे एकत्रित गायलेल्या ‘मोसे छल किये जाय’  आणि ‘घर मोरे परदेसिया’  या द्वंद्व गीतांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांची ही कामगिरी पाहिल्यानंतर सर्वांनी त्यांचे कौतुक केले आणि सर्व परीक्षकांनीही त्यांची प्रशंसा केली. पण परीक्षक अनु मलिक यांनी या दोघींची तुलना आशा भोसले आणि दिवंगत गानकोकिळा लता मंगेशकर यांच्याशी केली. 

अनु मलिक म्हणाले, सा रे ग म पच्या व्यासपिठावर इतक्या अपवादात्मक गुणी गायिकांची गाणी ऐकणे ही खूपच छान गोष्ट आहे. तुम्ही दोघीही खूपच अफलातून गायिका आहात आणि तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने गाणी सादर केली. आता या मंचावरून खाली उतरण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे आणि ती म्हणजे निष्ठा आणि रोनिता या सा रे ग म प कार्यक्रमाच्या अनुक्रमे आशा आणि लता आहेत.

नीति मोहन म्हणाली, तुमची गाणी ऐकल्यावर आम्ही सर्वांनी हे ठरवलं आहे तुम्ही दोघी या सुवर्णपदकाच्या मानकरी आहात. शिवाय मी म्हणेन की ऑडिशन्स आणि मेगा ऑडिशन्सच्या फेऱ्यांमधील तुमच्या अप्रतिम कामगिरीमुळे सा रे ग म प या कार्यक्रमाची शान अधिकच वाढली आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. 

Web Title: Anu Malik caught a glimpse of Ashaji and Lataji in the contestants of 'Sa Re Ga Mp'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.